सीमावादावर शांततापूर्ण तोडगा निघावा;अन्यथा भारतीय लष्करप्रमुखांचे वक्तव्य

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

भारत -चीन दरम्यान चालू असणारा पूर्व लडाख सीमावादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची भारताची अपेक्षा असल्याचं विधान भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केलं आहे.

लडाख: भारत -चीन दरम्यान चालू असणारा पूर्व लडाख सीमावादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची भारताची अपेक्षा असल्याचं विधान भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केलं आहे.त्याचवेळी भारतीय लष्कर कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं ही यावेळी ते म्हणाले.कोणत्याही संभाव्य परिस्थीताचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे.लडाखच्या पूर्व सीमेवर भारतीय सैनिक सज्ज असल्याचे ही नरवणे यांनी सांगितलं.

भविष्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येत असणारा आराखडा तयार करण्यात आला आहे.दहशतवादी कारवाया कोणत्याच देशाकडून सहन करणार नसल्याचा संदेश लष्करप्रमुखांनी दिला आहे.पाकिस्तान दहशतवादाला सतत प्रोत्साहन देत आला आहे.आणि विशेष म्हणजे दहशतवाद कारवायांना आळा घालनं आमचं काम आहे.आम्ही आमच्या मर्जीने, आमच्या वेळेनुसार हव्या त्या ठिकाणी त्याचा बिमोड करणं आमचा अधिकार आहे'.असं ही लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी स्पष्टपणे सांगितलं.मागच्या वर्षांचा आढावा घेताना लष्करप्रमुख म्हणाले,मागच्या वर्ष खूप आव्हानांनी भरलेलं होतं.सध्या कोरोना स्थिती आणि लडाख सीमावाद ही दोन मोठी आव्हानं आहेत

संबंधित बातम्या