नागालँड गोळीबार: एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात 30 लष्करी जवानांचा समावेश

नागालँडमध्ये लष्कराने केलेल्या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एसआयटीने गेल्या वर्षी आरोपपत्र न्यायालयात सोपवले होते.
nagaland
nagalandDainik Gomantak

नागालँडमध्ये लष्कराने केलेल्या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एसआयटीने गेल्या वर्षी आरोपपत्र न्यायालयात सोपवले होते. या प्रकरणी नागालँड पोलिसांनी लष्कराच्या 30 जवानांना आरोपी बनवले आहे. या प्रकरणी नागालँड पोलिसांनी संरक्षण मंत्रालयाला औपचारिक पत्र पाठवले आहे. (botched nagaland encounter 30 indian army special forces jawan chargesheeted by sit)

दरम्यान, एसआयटीच्या तपासात असे दिसून आले आहे की, 21 पॅरा स्पेशल फोर्सच्या जवानांनी हल्ल्यादरम्यान एसओपीचे पालन केले नाही. या घटनेत रात्री पिकअप ट्रकमधून घरी परतणाऱ्या 14 नागरिकांचा मृत्यू झाला. 4 डिसेंबर 2021 रोजी घडलेल्या घटनेनंतर रागाच्या भरात सैनिकांना घेरणाऱ्या गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला होता.

nagaland
"जर पैगंबर आज हयात असते तर...": बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ट्विट करत म्हटले होते की, आसाम, मणिपूर आणि नागालँडमधील (Nagaland) सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्या (AFSPA) अंतर्गत क्षेत्र कमी करण्यात आले आहे. नागालँडमधील घटनेनंतरच केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

शिवाय, 14 नागरिकांच्या (Citizens) मृत्यूनंतर नागा स्टुडंट फेडरेशनच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आल्याची माहिती आहे. मारल्या गेलेल्या नागरिकांना न्याय मिळावा आणि वादग्रस्त AFSPA कायदा रद्द करावा या मागणीसाठी हजारो लोकांनी निदर्शने केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com