प्रेम असाव तर असं! गर्लफ्रेंडच्या मृतदेहाशी ‘त्यानं’ लग्न केलं अन् शपथ घेतली, की…

Assam Youth Marries Dead Girlfriend: प्रियकरानं आपल्या मृत प्रेयसीशी लग्न करून तिला कायमचा निरोप दिला.
Assam Youth Marries Dead Girlfriend
Assam Youth Marries Dead GirlfriendDainik Gomantak

प्रेमात लोक काय करतात हे सांगणे कठीण आहे. रोजच्या जीवनात अशा अनेक घटना घडतात, त्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. अलिकडेच आसाममध्ये डोळ्यात पाणी आणणारी घटना घडली आहे. आजच्या जगात, जिथे काही लोकांसाठी प्रेमाला अर्थ नाही, तिथे काही लोक आहेत जे आपले वचन पूर्ण करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडतात.

आसामच्या (Assam) एका तरुणाने प्रेमाचे असे उदाहरण सादर केले की ते ऐकून सगळेच भावूक होतील. आजकाल लोक प्रियकर आणि प्रेयसीला जिवंतपणी नरकाचे दार दाखवतात, तर असे अनेक लोक आहेत ज्यांची कथा खरोखरच प्रेमावरील विश्वास दृढ करतात. एका तरुणाने आपल्या मृत प्रेयसीशी तिच्या अंत्यसंस्कारात लग्न केले आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली.

Assam Youth Marries Dead Girlfriend
Areez Khambatta Died: प्रसिद्ध 'रसना' कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष अरीज खंबाटा यांचे निधन

मोरीगाव येथील 27 वर्षीय वर बिटुपन तामुलीचे चापरमुख येथील कोसुआ गावातील 24 वर्षीय प्रार्थना बोरा हिच्यावर अनेक वर्षांपासून प्रेम होते. पण एके दिवशी प्रार्थना गंभीर आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. तिची वधू होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बिटुपन तामुलीने मृत्यूनंतरही तिच्याशी लग्न केले. अंतिम संस्कारादरम्यान त्यांनी लग्नात (Marriage) पार पाडले जाणारे सर्व विधी केले. बिटुपनने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून या दुःखद घटनेची माहिती दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com