जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, कुलगामात एका दहशवाद्याचा खत्मा

दहशतवादी (Terrorist) आणि भारतीय जवानांमध्ये चकमक अद्याप सुरु आहे.
पोलीस आणि सुरक्षा दलात (police and security forces) झालेल्या चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याने ठार मारण्यात आले आहे.
पोलीस आणि सुरक्षा दलात (police and security forces) झालेल्या चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याने ठार मारण्यात आले आहे. Dainik Gomantak

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) कुलगाममधील (Kulgam) मुनंद भागात पोलीस आणि सुरक्षा दलात (police and security forces) झालेल्या चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याने ठार मारण्यात आले आहे. दहशतवादी (Terrorist) आणि भारतीय जवानांमध्ये चकमक अद्याप सुरु आहे. भारतीय जवान दहशतवाद्यांचा शोध सध्या घेत आहेत.

रविवारी सकाळी सुरु झालेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये सुरक्षारक्षकांच्या टप्प्यात दहशतवादी असल्याची सूचना मिळाली. भारताच्या हद्दीत अलेल्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी घेरले. जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांचे जवान आणि पोलीस यांनी मिळून केलेल्या ऑपरेशनमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे.

या आधी शनिवारी देखील बांदीपोरा येथे सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांचा खत्मा केला होता. रविवारी देखील सुरु हे सर्च ऑपरेशन सुरु होते. आतापर्यंत एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून एके-47 जप्त करण्यात आली आहे. हे ऑपरेशन जम्मू-कश्मीरचे पोलीस, MARCOS आणि CRPF यांनी मिळून केले.

यावेळी बोलताना जम्मू-कश्मीरचे पोलीस म्हणाले, या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय सेनेचा एका जवान जखमी झाला आहे. हे ऑपरेशन अद्याप सुरु असून आणखीन दहशतवादी या भागात असण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com