कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्मा थेरेपीला ब्रेक !

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

प्लाझ्मा थेरेपीचा कोरोना उपचारासाठी फायदा होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्मा थेरेपीला आयसीएमआरच्या (ICMR National Covid Task Force ) शिफरसीनुसार आता हटविण्यात येणार आहे. कोरोना महामारीला (Corona Second Wave) तोंड देण्यासाठी काही दिवसांपूर्वी नेमण्यात आलेल्या टास्कफोर्सच्या मिटींगमध्ये प्लाझ्मा थेरेपीचा (PlasamTherapy) कोरोना उपचारासाठी फायदा होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या तब्बेतीमध्ये फार फरक पडत नाही.(Break the plasma therapy used to treat corona)

Coronavirus: 24 वर्षीय जुळ्या भावांचा दुर्देवी मृत्यू

परंतु प्लाझ्मा थेरेपाला हटविण्यामागचे काय कारण आहे, याबाबत बोलताना आयसीएमआरचे संशोधक डॉक्टर अपर्णा मुखर्जी (Aparna Mukherjee) म्हणाल्या, भारत (India), यूके, अमेरीका, अर्जेंटीना येथे झालेल्या एकूण 11 हजार चाचण्यांमधून प्लाझ्मा थेरेपीचा कोरोना रुग्णांवर फारसा सकारात्मक परीणाम होत नाही. भारतात मागील वर्षी एप्रिल ते ऑगस्टपर्यंत याच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या चाचण्या Severe आणि Mortality ला धरुन करण्यात आल्या होत्या, परंतु यामध्ये पाहिजे तसे परिणाम दिसले नाहीत. तसेच गंभीर रुग्णांवर या थेरेपीचा कोणताच फायदा झालेला दिसत नाही. असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले. 

संबंधित बातम्या