भारतीय सैन्याने उभारला 60 तासांच्या आत पूल 

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामबनमधील केला मोर येथील बेली पुलाचे बांधकाम भारतीय सैन्याने 60 तासांच्या आत पूर्ण केले आहे.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामबनमधील केला मोर येथील बेली पुलाचे बांधकाम भारतीय सैन्याने 60 तासांच्या आत पूर्ण केले आहे. त्यामुळे हा पूल पुन्हा  वाहतुकीसाठी खुला होणार आहे. भारतीय सैन्यातील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने वेळेआधी या पुलाचे काम पूर्ण केले असून, या पुलावर यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली आहे. व आता हा पूल वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहे. 

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामबन भागातील केला मोर येथील बेली पूल दरड कोसळल्यामुळे खराब झाला होता. आणि त्यामुळे मागील आठ दिवसांपासून या रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होऊन ठप्प झाली होती. त्यानंतर या पुलाचे काम भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी शाखेच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडे सोपविण्यात आले होते. त्यानंतर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने 60 तासांच्या आत या पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे.  

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे मुख्य प्रकल्प अभियंता आयके जग्गी यांनी याबाबत माहिती देताना, केला मोर येथील बेली पुल 60 तासांच्या आत पुन्हा उभारला असल्याचे सांगितले. व तसेच या पुलावर चाचणी देखील पार पडली असून, या पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे म्हणाले.    

संबंधित बातम्या