10 जून रोजी डीडी न्यूजवर आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 निमित्त पूर्वावलोकन कार्यक्रमाचे प्रसारण

Pib
मंगळवार, 9 जून 2020

समाजमाध्यमाचा उपयोग नागरीक या कार्यक्रमाच्या तयारीसाठी करू शकतात. 21 जून रोजी सकाळी 7 वाजता जगभरातील योग अनुयायी एकत्र येतील आणि त्यांच्या घरातून सर्वसामान्य योग शिष्टाचाराच्या प्रात्यक्षिकात सामील होतील.

नवी दिल्ली, 

केंद्रीय आयुष मंत्रालयाने मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 निमित्त पूर्वावलोकन कार्यक्रम आयोजित केला आहे. 10 जून 2020 रोजी संध्याकाळी 7 ते 8 यावेळेत डीडी न्यूज वाहिनीवर या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाच्या फेसबुक पेजवरही याचे थेट प्रसारण केले जाईल.

हा कर्टन रेजर आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 ची अधिकृत उलट गिनतीचा कार्यक्रम आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देशाला संबोधित करतील. आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

कोविड-19 मुळे सध्या देशात उद्भवलेल्या आरोग्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी योग दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल माध्यमातून साजरा केला जाईल. कोरोना विषाणूचे अत्यंत संसर्गजन्य प्रवृत्ती लक्षात घेता मंत्रालय लोकांना घरीच योगासन करण्यास प्रोत्साहित करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी “माझे जीवन, माझा योग” (“My life, My Yoga”) या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेची देखील घोषणा केली आहे.

कर्टन रेझर नंतर 10 दिवस (म्हणजे 11 जून 2020 ते 20 जून 2020 पर्यंत) डीडी भारती/डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर सकाळी 8.00 ते 8.30 या वेळेत सर्वसामान्य योग शिष्टचारावरील प्रशिक्षण सत्र प्रसारित होईल.  देशातील प्रमुख योग शिक्षण संस्था, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था, नवी दिल्ली यांच्यामार्फत याचे आयोजन केले जाईल.

योग गुरु स्वामी रामदेव, श्री श्री रविशंकर, सद्गुरु जग्गी वासुदेव, डॉ. एच.आर. नागेंद्र, कमलेश पटेल (दाजी), भगिनी शिवानी आणि स्वामी भारत भूषण आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि मानसिक आरोग्य तसेच कल्याण सुधारण्यासाठी आपण योगाचा कसा उपयोग करू शकतो हे समजावून सांगतील. सध्याच्या कोविड-19 च्या साथीच्या आजाराच्या कठीण काळात लोकांना घरीच योग करण्यासाठी सक्षम करण्यासाठी मंत्रालयाने घेतलेल्या महत्त्वाच्या उपायांवर मंत्रालयातील मान्यवर प्रकाश टाकतील. एम्स संचालक, एआयआयए संचालक आणि एमडीएनआयवाय संचालक तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये सामील होतील.

यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन, जग कोविड-19 च्या सांसर्गिक चक्रात अडकलेले असताना आला आहे. हे महत्वाचे आहे की, योग अभ्यास आरोग्य सुदृढ करतो आणि ताण कमी करतो त्यामुळे सद्य स्थिती मध्ये लोकांसाठी हे विशेषतः प्रासंगिक आहे. म्हणूनच आयडीवाय – 2020 साठी शारीरिक अंतराचे नियम सुनिश्चित करत लोकांनी आपापल्या घरातूनच या कार्यक्रमात सहभागी होऊन योग शिकणे फायद्याचे ठरेल. आयुष मंत्रालय आणि इतर अनेक सहभागी संस्था त्यांच्या पोर्टलवर विविध डिजिटल स्त्रोत पुरवित आहेत आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबसह 

संबंधित बातम्या