'बीएसएफ'ने भारत-पाकिस्तान सीमेवर ६ पाकिस्तानी तरुणांना घेतलं ताब्यात

PTI
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

भारतीय सीमा सुरक्षा दलाने भारत पाकिस्तान सीमेवर ६ पाकिस्तानी तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

पंजाब : सीमा सुरक्षा दलाने काल रात्री पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागातील सहा पाकिस्तानी तरुणांना अटक केली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. हे सर्व पकडलेले तरूण वय 20 ते 21 वर्षे वयोगटातील आहे. त्यांना पहाटे पाचच्या सुमारास अमृतसरच्या सीमा भागातून पकडण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त पथकाद्वारे या सहा तरुणांची चौकशी केली जात आहे की ते अनवधानाने सीमेवर पोहोचले की त्यांचा काही हेतू होता.

 

संबंधित बातम्या