Rajasthan: पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे येत होता अमली पदार्थ; जवानांनी दोघांना फिल्मी स्टाईलने केली अटक

पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पाठवल्या जाणाऱ्या अमली पदार्थाची डिलिव्हरी घेण्यासाठी हे दोघे याठिकाणी आले होते.
BSF
BSF Dainik Gomantak

पश्चिम राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-पाक सीमेजवळ (Indo-pak Border), दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. 2023 च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय सीमेवर अमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणे वाढू लागली आहेत.

पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पाठवल्या जाणाऱ्या अमली पदार्थाची डिलिव्हरी घेण्यासाठी हे दोघे याठिकाणी आले होते. शनिवारी रात्री गंगानगर जिल्ह्यात बीएसएफने (BSF) या दोन तस्करांना अटक केली.

BSF
PM Modi Roadshow: पंतप्रधान मोदींचा सोमवारी दिल्लीत होणार ग्रॅन्ड 'रोड शो'

दोन्ही तस्कर हेरॉईनची डिलिव्हरी घेण्यासाठी श्रीगंगानगर परिसरात आले होते. ही माहिती मिळताच बीएसएफने तस्करांचे लोकेशन ट्रेस करून त्यांना जिल्ह्यातील रायसिंगनगर सीमा भागात अटक केली. बीएसएफ आणि पोलिसांचे पथक दिवसभर कामात व्यस्त होते.

या घटनेची माहिती बीएसएफने पोलिसांना (BSF And Rajasthan Police) दिली. यावर बीएसएफ आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, तस्करांच्या अन्य साथीदाराचा पत्ता अद्याप लागलेला नाही. अन्य तस्करांचा शोध सुरू आहे.

BSF
Rajnath Singh: भाजप सरकारने मीडियावर कधीही बंदी घातली नाही... संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य

बीएसएफचे जवान तस्करांच्या गाडीजवळ पोहोचले आणि त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कारमधील तस्करांनी भरधाव वेगाने कार चालवण्यास सुरुवात केली.

यानंतर बीएसएफ जवानांनी कारवर गोळीबार केला, त्यामुळे तस्कर घाबरले आणि पळून जाऊ लागले. दरम्यान, बीएसएफ जवानांनी दोन तस्करांना पकडले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

तस्करांकडे सापडलेल्या हेरॉईनचे वजन 5 ते 6 किलो असू शकते. बीएसएफकडून पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलिस दल सतर्क झाले आणि त्यांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली.

शोध सुरू असताना इतर कोणत्याही तस्करांची अद्याप पुष्टी झालेली नाही. सध्या दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com