भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर भुयार सापडले

पीटीआय
रविवार, 30 ऑगस्ट 2020

जम्मूत ‘बीएसएस’ला दक्षतेचा इशारा

नवी दिल्ली/जम्मू:  सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) शनिवारी जम्मूतील सांबा विभागात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपणाखाली भुयार आढळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

‘बीएसएफ’च्या गस्ती पथकाला आंतरराष्ट्रीय सीमेवर हे भुयार गुरुवारी (ता.२७) आढळले. शोधले. अशी भुयारांचा वापर पाकिस्तानमधून घुसखोरीसाठी व शस्त्र व अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याने या भागात मोठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.  हे भुयार भारताच्या बाजूकडील सीमा कुंपणापासून ५० मीटर दूर व जमिनीखाली २५ मीटरवर आहे. ते २० फूट लांब तर ३-४ फूट रुंद आहे.  त्याचे सुरुवातीचे टोक पाकिस्तानमध्ये तर शेवटचे टोक भारताच्या बाजूने आहे. त्याच्या तोंडावर वाळूने भरलेली आठ ते दहा पोती सापडली आहेत. पोत्यांवर कराची आणि शक्करगडचा शिक्का आहे.

पाकिस्तानी ठाणे ४०० मीटरवर
सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठीची यंत्रणा अखंड ठेवण्याची व त्यात कोठेही त्रुटी न ठेवण्याचे निर्देश ‘बीएसएफ’चे महासंचालक राकेश अस्थाना यांनी सीमेवरील त्याच्या जवानांना दिले आहेत. या भुयारापासून पाकिस्तानी सीमेवरील ठाणे ४०० मीटरवर आहे. 

संबंधित बातम्या