बीएसएफच्या जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक घुसखोराला केले ढेर 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडले आहे.

दिल्ली : आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडले आहे. बीएसएफच्या जवानांनी भारत पाक सीमेवरुन घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी घुसखोराला ढेर केल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न दहशतवादी मागील काही काळापासून करत आहेत. 

कोरोनानंतर या धोक्यांमुळे येणार मानवजातीवर संकट; बिल गेट्स यांनी दिला इशारा

घुसखोरीचा प्रयत्न सांबा सेक्टरला लागून असलेल्या चक फकिरा भागातून करण्यात येत आहे. आज पहाटे सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास पाकिस्तानकडून घुसखोर भारतीय सीमेकडे येत होता.या घुसखोराला परत जाण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर देखील याकडे दुर्लक्ष करून घुसखोर भारतीय सीमेच्या अगदी जवळ पोहोचला, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. बीएसएफच्या जवानांनी घुसखोराला शेवटचा मागे हटण्याचा इशारा दिला पण तो मागे हटला नाही. त्यानंतर सैनिकांनी तिथेच गोळी झाडुन ठार केले. भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या घुसखोरांचा मृतदेह सीमेजवळ स्पष्टपणे दिसत असल्याचे जवानांनी म्हटले आहे. तर पाकिस्तानी सैनिकांनी अद्याप त्याचा मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यादरम्यान,  बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात स्पष्टीकरण देताना सांबाच्या बीओपी चक फकीरा या परिसरातील बीपी क्रमांकाजवळ कुंपणाच्या दिशेने भारतीय सीमेवर घुसखोरी करणारा पाक घुसखोर नजरेस पडल्याचे सांगितले. व त्यानंतर अंतिम इशारा देऊनही घुसखोर मागे न हटल्यामुळे आणि संशयास्पद परिस्थितीत कुंपणाभोवती फिरत असल्याने त्याला भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच त्याला ठार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळेस घुसखोर नियंत्रण रेषा ओलांडून सुमारे 40 मीटर अंतरात घुसला होता असे बीएसएफच्या अधिऱ्यांनी पुढे सांगितले. तसेच या भागात एक बोगदाही सापडला असून, तो दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी तयार करण्यात आल्याचे बीएसएफच्या सांगितले. 

संबंधित बातम्या