President Draupadi Murmu
President Draupadi MurmuDainik Gomantak

Budget 2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणातील प्रमुख 10 मुद्दे

Budget 2023: राष्ट्रपतींनी दहशतवाद, पायाभूत सुविधा ,मेड इन इंडिया आणि ग्रीन ग्रोथसारख्या अनेक विषयांबाबत त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला आहे.

Budget 2023: संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेला संबोधित केले आहे. यावेळी राष्ट्रपतींनी दहशतवाद, पायाभूत सुविधा ,मेड इन इंडिया आणि ग्रीन ग्रोथसारख्या अनेक विषयांबाबत त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला आहे.

त्याबरोबरच,सर्जिकल स्ट्राइक ,दहशतवाविरुद्ध उचललेली ठोस पावले ,370 कलम संविधानातून हटविण्यासारखा घेतलेला निर्णय याचासुद्धा आपल्या भाषणात उल्लेख केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी आत्ताचे सरकार न भीता काम करत असल्याचे म्हटले आहे.

जनतेने या सरकारला सलग निवडून दिल्याबद्दल राष्ट्रपतींनी सरकारचे आभार मानले आहेत.जाणून घेऊयात राष्ट्रपतींच्या भाषणातले 10 महत्वाच्या बाबी.

1.भारत स्टार्टअपहब बनण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे.

भारतातली युवापिढी आज इनोव्हेशनची ताकद दाखवत आहे.भारतात सध्या 90 हजार पेक्षा जास्त स्टार्टअप उद्योग उभारले गेले आहेत.

2.सैन्यशक्ती मजबूत करण्यावर जोर

सैन्यशक्ती आणखी मजबूत करण्यावर सरकार भर देणार असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

3. पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करणार

मागच्या आठ वर्षात मेट्रो( Metro)चे नेटवर्कमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.त्याबरोबरच, देशात 100 पेक्षा जास्त वॉटरवे तयार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पीएम ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांमध्ये वाढ करणार असल्याचे म्हटले आहे.

4. महिला( Womens) सशक्तीकरण करण्यावर सरकार महत्व देईल

राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत आलेले यश तुम्ही पाहिले आहे. देशात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

5. सुभाष चंद्र बोस,आजाद हिंद फौजेला दिला सन्मान

President Draupadi Murmu
Andhra Pradesh: CM जगन रेड्डी यांची मोठी घोषणा, आंध्र प्रदेशची नवी राजधानी असणार विशाखापट्टणम

6. डिजीटल व्यवस्थेवर जोर

डिजिटल व्यवस्थेवर जोर देऊन पारदर्शी काम करणार असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

7. मेड इन इंडियामुळे भारताला फायदा

मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यामुळे देशाला फायदा झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत शस्त्रांची निर्यात 6 पटींनी जास्त करत आहे.

8. पंचप्रेरणेने देश प्रगतीपथावर जात आहे.

9. एविएशन क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतल्याचे म्हटले आहे.

10. ग्रीन ग्रोथवर सरकारचे लक्ष

भारत संपूर्ण जगाला मिशन लाइफ बरोबर जोडण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com