मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात

दैनिक गोमन्तक
रविवार, 27 डिसेंबर 2020

 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाणे महापालिकेनं बुलेट ट्रेनच्या थांब्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव अडकून ठेवला असल्याने केंद्र राज्यातील संघर्षातून बुलेट ट्रेनचं काम लांबण्याचे संकेत दिसत आहे.

मुंबई:  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला हा प्रकल्प आहे. ठाणे महापालिकेनं बुलेट ट्रेनच्या थांब्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव अडकून ठेवला असल्याने केंद्र राज्यातील संघर्षातून बुलेट ट्रेनचं काम लांबण्याचे संकेत दिसत आहे. त्यातच रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांना जागा मिळण्यास विलंब झाल्यास फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचे संकेतही दिले गेले आहेत.

ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मागील आठवड्यात गुंडाळला. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुद्दा अडचणीत आला आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी या मुद्यावर बोलताना महत्त्वाची माहिती दिली. “बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्र करण्याची भारतीय रेल्वेची इच्छा आहे. म्हणून त्यादृष्टीने आम्ही योजना तयार करत आहोत. महाराष्ट्र सरकारनं पुढील चार महिन्यात ८० जमीन उपलब्ध करून देण्याची आम्हाला हमी दिली आहे,” असं यादव म्हणाले.

“जर प्रकल्पाला जागा मिळाली, तर बुलेट ट्रेन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये धावेल. त्याचबरोबर जर जागा उपलब्ध करून देण्यास उशिर झाला, तर पहिल्या टप्प्यात फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन धावू शकतो का, याचीही तयारी आम्ही करत आहोत,” असंही वक्तव्य विनोद कुमार यादव यांनी केलं.

संबंधित बातम्या