कृषी कायदे मागे घेण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

संसदेच्या आगामी अधिवेशनात तीन कृषी कायदे मागे घेण्याची विधेयके मांडली जाणार आहेत.
Cabinet approved bill for repeal the farm bill in winter session
Cabinet approved bill for repeal the farm bill in winter session Dainik Gomantak

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) बैठकीत तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेमुळे सरकार आणि शेतकरी (Farmers) यांच्यातील गेल्या 14 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.(Cabinet approved bill for repeal the farm bill in winter session)

संसदेच्या आगामी अधिवेशनात तीन कृषी कायदे मागे घेण्याची विधेयके मांडली जाणार आहेत. भारत सरकारने 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेच्या बुलेटिनमध्ये शेती कायदे रद्द विधेयक, 2021 सूचीबद्ध केले आहे. कायदे मागे घेण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर राष्ट्रपती त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करतील. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ते राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल.

Cabinet approved bill for repeal the farm bill in winter session
भाजप खासदार गौतम गंभीर यांना ISIS कडून जीवे मारण्याची धमकी

लोकसभेच्या बुलेटिननुसार द फार्म लेज रिपील बिल, 2021 विधेयक 'शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) कायदा, 2020, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत हमी करार, कृषी सेवा कायदा, 2020 आणि आवश्यक वस्तू (आवश्यक वस्तू) कायदा, रद्द करण्यासाठी सादर केले जाईल. यापूर्वी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की केंद्र सरकार तीन कृषी कायदे रद्द करेल आणि या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक ते विधेयके सरकार आणेल त्याचबरोबर किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ठरवण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार असल्याची घोषणा देखील अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली होती.

2020 मध्ये केंद्राने कायदा केल्यापासून शेतकरी संघटना तीन कृषी कायद्यांना सातत्याने विरोध करत आहेत. सरकारच्या निर्णयानंतरही कायदे संसदेत परत येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्या संघटनांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com