अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलर ट्यून होणार बंद; वाचा कोण घेणार त्यांची जागा?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

उद्यापासून मोबाईलवर ऐकू येणारी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बंद होणार आहे. मोबाईल वरून फोन केल्यानंतर डायल ट्यून ऐकू येण्याऐवजी मागील काही महिन्यांपासून अमिताभ बच्चन यांची 'दो गज दूरी मास्क है जरूरी' ही कॉलर ट्यून ऐकायला मिळत असे. मात्र आता शुक्रवारपासून मोबाइलची डीफॉल्ट कॉलर ट्यून बदलणार आहे. 

उद्यापासून मोबाईलवर ऐकू येणारी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बंद होणार आहे. मोबाईल वरून फोन केल्यानंतर डायल ट्यून ऐकू येण्याऐवजी मागील काही महिन्यांपासून अमिताभ बच्चन यांची 'दो गज दूरी मास्क है जरूरी' ही कॉलर ट्यून ऐकायला मिळत असे. मात्र आता शुक्रवारपासून मोबाइलची डीफॉल्ट कॉलर ट्यून बदलणार आहे. 

पानिपतावर लढला अवघा महाराष्ट्र..

आतापर्यंत अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोनापासून वाचण्यासाठी आणि सावधगिरी बाळगण्यासाठी घेण्यात येणाऱ्या काळजी संबंधित आवाज ऐकत होते. मात्र यापुढे ही कॉलर ट्यून आपल्याला ऐकू येणार नाही. तर त्याच्या जागी एखाद्याला कॉल केल्यानंतर कोरोना लसीशी संबंधित कॉलर ट्यून ऐकायला मिळणार आहे. कोरोना लसीशी माहिती देणारी ही कॉलर ट्यून हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत राहणार असून, ती जसलीन भल्ला यांच्या आवाजातील असेल. 

अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बदलण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे एखाद्याला कॉल केल्यानंतर कॉलर ट्यूनमध्ये जसलीन भल्ला यांचा आवाज ऐकू येईल. कोरोनाच्या जागृतीनंतर सरकारने आता कोरोनाच्या लसीबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. व त्यामुळे नवीन कॉलर ट्यूनमध्ये लसीबद्दल जागरूक केले जाईल आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असा संदेश देण्यात येईल. तसेच ही कॉलर ट्यून 30 सेकंदांची असणार आहे.     

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बिग बी यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत अमिताभ बच्चन यांच्याऐवजी खऱ्या कोरोना वॉरियरचा आवाज असणे आवश्यक आहे असे म्हटले होते. व त्यामुळे बिग बी यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढावी असे याचिकेत नमूद केले होते.  

विराट अनुष्का म्हणाले, आमच्या मुलीचे फोटो काढू नका

जसलीन भल्ला या व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. अनेक दशकांपासून त्या व्हॉईस ओव्हर देत आहेत. दिल्ली मेट्रो, स्पाइस जेट आणि इंडिगो विमानात त्यांनी आपला व्हॉईस ओव्हर दिलेला आहे.    

संबंधित बातम्या