PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना मिळू शकतो शांततेचा नोबेल? नॉर्वेहून पुरस्कार समितीचे पथक भारतात...

पुरस्कार समितीच्या सदस्याकडून मोदींचे तोंडभरून कौतूक
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

PM Narendra Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जगभरात आहे. गेल्या ९ वर्षांपासून मोदी जागतिक स्तरावर देशाचे नेतृत्व करत आहेत. आता चक्क शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

नोबेल पुरस्कार समितीच्या सदस्यानेच पंतप्रधान मोदींचे कौतूक केले आहे. त्यामुळे आगामी काळात कदातिच भारतीयांना नोबेल पुरस्काराशी संबंधित मोठी बातमी ऐकायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

PM Narendra Modi
Story Of Samosa Singh: मोठ्या पगाराच्या नोकरीला लाथ मारली, समोसा विकून नवरा बायको कमावतायेत लाखो रुपये

सध्या नोबेल पारितोषिक समितीची टीम नॉर्वेहून भारतात आली आहे. हीच समिती नोबेलच्या शांततेसाठीच्या पुरस्काराचा विजेता ठरवत असते. मह्तवाचे म्हणजे, या समितीच्या उपनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींसारख्या शक्तिशाली नेत्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची प्रचंड क्षमता आहे.

एसले तोजे (Asle Toje) असे या उपनेत्याचे नाव असून त्यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “आम्हाला नोबेल शांतता पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय नामांकने मिळत आहेत. आशा आहे की जगातील प्रत्येक नेता नोबेल शांतता पुरस्कारासाठी आवश्यक असलेले काम करेल. मी मोदींच्या प्रयत्नांना अनुसरत आहे.

मोदींसारख्या ताकदवान नेत्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबरदस्त क्षमता आहे. पंतप्रधान मोदी हे अतिशय शक्तिशाली देशातून आले आहेत. त्यांना जगात खूप गांभीर्याने घेतले जाते. त्याच्यामध्ये अफाट विश्वासार्हता आहे. हे भयंकर युद्ध थांबवण्यासाठी ते त्यांची विश्वासार्हता आणि ताकद वापरतील.

PM Narendra Modi
तब्बल 12 वर्षापासून दरवर्षी गर्भवती राहिली ही महिला; वयाच्या 28 व्या वर्षापर्यंत झाली 'इतकी' अपत्ये

एसले म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी रशिया, अमेरिका आणि चीनच्या प्रमुखांशी युद्धाबाबत बोलले आहेत. त्यांनी आगामी भविष्य युद्धाचे नाही तर शांततेचे असावे, असे सांगितेल आहे. मला आनंद आहे की मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नाहीत तर जगातील शांततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवरही ते काम करत आहेत.

जगाने भारताकडून शिकण्याची गरज आहे. भारत महासत्ता होणार हे निश्चित आहे. एकीकडे रशिया आणि अमेरिका अणुयुद्ध आणि बचाव यावर बोलतात. या देशांनी भारताकडे पाहण्याची गरज आहे. अण्वस्त्राचा वापर प्रथम न करण्याचे भारताचे धोरण हे सर्वाधिक जबाबदार धोरण आहे.

दरम्यान, नॉर्वेमधील भारतीय मूळाचे खासदार हिमांशू गुलाटी यांनीही येत्या काळात अनेक भारतीय नोबेल पुरस्कारासाठी नामांकित होतील, असे म्हटले आहे. जगात शांतता राखण्यासाठी पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची आहे.

रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश भारताचा आदर करतात. हे युद्ध थांबवायचे असेल तर भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.

जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या, समाजसेवी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com