कॅण्डीडा ऑरिसची साथ ठरू शकते कोरोनापक्षाही भयंकर

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

सेंटर्स ऑफर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन या आरोग्य नियंत्रक संस्थेमधील वैज्ञानिकांनी दिलेल्या वृत्तानुसार कॅण्डीडा ऑरिस ही बुरशी ब्लॅक प्लेग सारखिच आहे.

नवी दिल्ली:  सेंटर्स ऑफर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन या आरोग्य नियंत्रक संस्थेमधील वैज्ञानिकांनी दिलेल्या वृत्तानुसार कॅण्डीडा ऑरिस ही बुरशी ब्लॅक प्लेग सारखिच आहे. कोरोनाव्हायरस संपूर्ण जगासाठी डोकेदुखी आहे. कितीतरी लोकांचा कोरोना काळात मृत्यू झाला.त्य़ाचबरोबर बर्ड फ्लू देखील डोकेदूखी ठरत आहे. देश सध्या कोरोनावर उपचार शोधतच आहे की,  आता  इतरही अनेक अडचणी दार ठोकत आहेत. शास्त्रज्ञांना कोरोनाबरोबर आता आणखी एक नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे. सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोलच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, पुढील काळात साथीचा संसर्ग  कॅन्डिडा ऑरिसमुळे जगभर पसरू शकतो. ही एक बुरशी आहे जी ब्लॅक प्लेगसारखी दिसते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जर ही बुरशी रक्तासह वाहू लागली तर ती प्राणघातक ठरू शकते. हा व्हायरस रुग्णालयातील कॅथेटर किंवा इतर ट्यूब आधारित उपकरणांद्वारे शरीरात प्रवेश करू शकते. अशा परिस्थितीत शरीराला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते.

कॅण्डीडा ऑरिस  विषाणूचा इतिहास

जपानमध्ये 2009 मध्ये सीओरस विषाणू संशोधकांना सापडला होता. सीओरिस हा लॅटिन भाषेतील शब्द आहे. या व्हायरसचे संक्रमण शरीरात कोणत्याही पृष्ठभागावर होवू शकते. सामान्यत: या बुरशीवर अँटीफंगल औषधांचा उपचार करून रुग्णांना बरे केले जाते.

हा विषाणू पृष्ठभागावर किती काळ टिकेल?

शास्त्रज्ञांच्या मते हा विषाणू बराच काळ शरिरावर जिवंत राहू शकतो. इम्पीरियल कॉलेज लंडनच्या एपिडेमिओलॉजिस्ट जोहाना रोड्सच्या मते, ही बुरशी कोरोनासारखीच शरीराच्या पृष्ठभागावर राहू शकते. पृष्ठभागावर ते जास्त काळ जगू शकतात आणि यामुळे कोरोनापेक्षाही धोकादायक ही बुपशी राहू शकते. अहवालानुसार, हा विषाणू माकडांपासून पसरला आहे.

या आजाराची प्रमुख लक्षणे:

वैज्ञानिकांच्या मते, येणार्‍या काळात ही बुरशी कोरोनासारख्या जागतिक साथीच्या  रूपात उदयास येऊ शकते. नैसर्गिक गोष्टींचा अभाव किंवा हवामानातील बदल देखील या आजाराचे मुख्य कारण असू शकते. नेहमीच सीओरिस संसर्गाची लक्षणे ओळखणे सोपे नसते त्यामुळे प्रयोगशाळेत चाचणी करूनच हा व्हायरस ओळखला जाऊ शकतो.

अ‍ॅमेझॉनचे CEO जेफ बेझोस देणार पदाचा राजीनामा -

संबंधित बातम्या