Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जम्मूत स्फोट? जयराम रमेश म्हणाले...

Rahul Gandhi: जयराम रमेश यांनी रविवारी सांगितले की, 'भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.'
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak

Bharat Jodo Yatra: जम्मूत झालेल्या दोन बॉम्बस्फोटात नऊ जण जखमी झाल्याच्या एका दिवसानंतर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी रविवारी सांगितले की, 'भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.' सोमवारी त्याच ठिकाणाहून यात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जयराम रमेश म्हणाले की, 'जम्मू-काश्मीर (Jammu And Kashmir) प्रशासन सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष देईल अशी अपेक्षा आहे. आम्हालाही तसे आश्वासन दिले आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेशी आम्ही तडजोड करणार नाही.'

रमेश पुढे म्हणाले की, 'भारत जोडो यात्रेला थांबवण्यासाठी हे स्फोट घडवून आणण्यात आले होते की नाही हे निश्चित नाही. याची माहिती फक्त सुरक्षा एजन्सी देऊ शकतात. पण भारत जोडो यात्रा कशानेही थांबणार नाही याची खात्री मी देतो.'

Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra: राहुल गांधीची भारत जोडो यात्रा स्थगित, कारण...

दरम्यान, ही यात्रा गुरुवारी संध्याकाळी पंजाबमार्गे जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दाखल झाली होती. शनिवारी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर ही यात्रा रविवारी हिरानगर येथून निघाली आणि 23 जानेवारीला जम्मूला पोहोचेल. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात झाली.

राहुल बनिहालमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करु शकतात

कॉंग्रेस (Congress) नेत्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत बनिहाल येथे स्थानिक आणि भारत जोडो यात्री यांच्यासमवेत प्रजासत्ताक दिन साजरा करु शकतात. गांधी कुटुंबाच्या सुरक्षेबाबत रमेश म्हणाले की, 'दहशतवादाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. दहशतवादी कट रचणाऱ्यांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.'

Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत सहभागी होणार भाजपचा 'हा' दिग्गज नेता? पण...

सांबाच्या चक नानकमध्ये रमेश म्हणाले की, 'गांधींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही सुरक्षा संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करत आहोत.'

Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra: राहुल गांधी संतापले, 'सेल्फी काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला...', पाहा Video

या स्फोटात 9 जण जखमी झाले आहेत

जम्मूतील गजबजलेल्या भागात शनिवारी झालेल्या दोन स्फोटात नऊ जण जखमी झाले. नरवालच्या ट्रान्सपोर्ट नगर भागात उभ्या असलेल्या एसयूव्ही आणि जवळच्या स्क्रॅप यार्डमध्ये स्फोट करण्यासाठी आयईडीचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

या हल्ल्याचा निषेध करताना पक्षाचे प्रवक्ते शर्मा म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील यात्रेचा अंतिम टप्पा सुरक्षा यंत्रणांशी सल्लामसलत करुन ठरवण्यात आला होता. ते पुढे म्हणाले की, 'आम्हाला आमच्या नेत्याच्या सुरक्षेची चिंता आहे. एक दिवसापूर्वी झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com