लैंगिक अत्याचारप्रकरणी युवकाची गावकऱ्यांनी काढली धिंड

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

राजस्थानातील झालवर जिल्ह्यात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका २८ वर्षीय युवकाची गळ्यात बूटांचा हार घालून गावात धिंड काढण्यात आली. ​

कोटा: राजस्थानातील झालवर जिल्ह्यात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका २८ वर्षीय युवकाची गळ्यात बूटांचा हार घालून गावात धिंड काढण्यात आली. सोशल मीडियावरही याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. संबंधित युवकाविरुद्धही तक्रार नोंदविण्यात आली. या युवकाला संबंधित महिलेच्या पतीने स्वत:च्या घरी पकडले होते. 

संबंधित बातम्या