कृष्ण जन्मभूमीवरून न्यायालयामध्ये खटला

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिराबाबत ऐतिहासिक निकाल देण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच आता कृष्ण जन्मभूमीच्या वादाने डोके वर काढले आहे.

मथुरा: सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिराबाबत ऐतिहासिक निकाल देण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच आता कृष्ण जन्मभूमीच्या वादाने डोके वर काढले आहे. मथुरेतील सगळ्या जमिनीवर दावा सांगणारा खटला येथील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. 

येथील प्रत्येक इंच जमीन ही कृष्ण भक्तांसाठी पवित्र असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. भगवान श्रीकृष्ण विराजमान यांच्यावतीने विधिज्ञ हरी शंकर आणि विष्णू जैन यांनी येथील स्थानिक न्यायालयामध्ये हा खटला दाखल केला. याचिकाकर्त्यांनी येथील १३.३७ एकर जमिनीवर हक्क सांगितला असून मंदिराला लागून असलेली शाही इदगाह मशीद हटविण्यात यावे अशी मागणीही केली आहे.

संबंधित बातम्या