भारत पाकिस्तान सीमारेषेवर सापडलेल्या संशयित कबुतराविरुध्द पंजाबमध्ये गुन्हा दाखल

A case has been registered in Punjab against a suspected pigeon found on the India Pakistan border
A case has been registered in Punjab against a suspected pigeon found on the India Pakistan border

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध गेल्या अनेक दशकांपासून जास्त काळ तणावपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तान सीमारेषेवर कमालीची सुरक्षा व्यवस्था राहणार हे अपेक्षितच आहे. परंतु ती कमालीची आणि चोख असू शकते, याचं प्रत्यंतर नुकत्याचं एका घटनेतून आलं आहे. 'परिंदा भी नही आ सकता' हा संवाद आपण अनेकदा चित्रपटातून ऐकला असेलच. पण या घटेनतून  प्रत्यक्षात अनुभवाला मिळाला! कारण भारत-पाकिस्तान सीमारेषेवर उडणाऱ्या एका कबुतराची पंजाब पोलिसांनी धरपकड करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. य़ा कबुतराच्या पायाशी चिठ्ठी बांधली असल्याचं देखील पंजाब पोलिसांना आढळून आलं असून त्यावर एक अपरिचित असा नंबर लिहिला असल्याची माहिती समोर आली आहे. (A case has been registered in Punjab against a suspected pigeon found on the India Pakistan border)

भारत पाकिस्तान यांच्यातील रोरनवाला इथल्या सीमारेषेवर हा प्रकार घडला आहे. सीमारेषेवरील पोस्टवर कॉन्स्टेबल नीरज कुमार हे तैनात होते. ही पोस्ट पाकिस्तानच्या सीमारेषेपासून 500 मीटरच्या अंतरावर आहे. 17 एप्रिलला नीरज कुमार कॅम्पच्या पोस्टवर तैनात असताना अचानक एका काळ्या- पांढऱ्या रंगाचं कबुतर नीरज कुमार यांच्या खांद्यावर येऊन बसलं! आपण अतिसंवेदनशील अशा सीमरेषेवर तैनात असल्याचं पूर्ण भान असणारे नीरज कुमार यांनी प्रसंगासावधान राखून लगेच कबुतराला पकडलं. आणि पोस्टवर तैनात असणारे पोस्ट कंमाडर ओमपाल सिंग यांना नीरज कुमार यांनी लागलीच माहिती दिली.

ओमपाल सिंग यांनी या कबुतराची एकदम काळजीपूर्वक पाहणी केली. पाहणी केल्य़ानंतर कबुतराच्या पायाशी काहीतरी बांधल्याचं सिंग यांना दिसलं. ओमपाल सिंग यांनी कबुतराच्या पायाशी चिकटलेला कागद मोकळा करुन पाहिल्यानंतर त्याच्यावर एक नंबर लिहिलेला दिसला. हा नंबर एका लॅन्डलाईनचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा नंबर पाहिल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्वरित कबुतराच्या विरुध्द अमृतसरच्या काहागड पोलिस ठाण्यामध्ये गुन्ह दाखल केला आहे. गेल्यावर्षी देखील जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचं कबुतर सापडलं होतं. या कबुतराला पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिलं असल्याचं समजलं होतं. तो संदेश एका कोडवर्डमधला होता, असं प्रशासनाकडून नंतर सांगण्यात आलं होतं. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com