देशातील अनेक राज्यांत कोरोना, डेंग्यूसह इतर व्हायरल तापाची प्रकरणे वाढली

या रोगांचा प्रसार पर्यावरणीय घटकांद्वारे (Environmental factors) होतो. वेक्टर स्प्रेडसाठी (Vector spread) अनुकूल वातावरणामुळे पावसाळ्यात आणि मान्सूननंतरच्या काळात त्यांचा प्रसार जास्तीत जास्त असतो.
महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहारमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रातही डेंग्यू, मलेरियासह हंगामी आजारांनी कहर केला आहे.
महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहारमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रातही डेंग्यू, मलेरियासह हंगामी आजारांनी कहर केला आहे. Dainik Gomantak

नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागांमध्ये डेंग्यू (Dengue) आणि व्हायरलसह (Viral) विविध प्रकारच्या तापाची (Fever) प्रकरणे नोंदवली जात आहेत. आरोग्य विभागाच्या (Department of Health) अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या (West Bengal) जलपाईगुडीमध्ये ताप आणि अपचनामुळे 130 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) डेंग्यूमुळे आणखी दोन मृत्यू झाल्याची माहिती प्रीटरने दिली आहे. यामुळे आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 60 वर पोहोचली आहे. सोमवारी उत्तर प्रदेशात व्हायरल तापाची एकूण 60 प्रकरणे नोंदवली गेली.

महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहारमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रातही डेंग्यू, मलेरियासह हंगामी आजारांनी कहर केला आहे.
ड्रोनद्वारे कोरोना लसीच्या वितरणास ICMRची सशर्त मंजूरी

फिरोजाबाद येथे गेल्या तीन आठवड्यांपासून डेंग्यू आणि प्राणघातक व्हायरल तापाशी साथ आहे. बळी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुले आहेत. दरम्यान, जिल्हा दंडाधिकारी चंद्र विजय सिंह म्हणाले, वृत्तपत्रांच्या अहवालांच्या आधारे पॅथॉलॉजीसाठी अधिक शुल्क आकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्याची काही प्रकरणे मथुरा, आग्रा, मैनपुरी येथेही आहेत. लखनौचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक प्रकाश यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, आतापर्यंत खाजगी पॅथॉलॉजिस्ट वेगवेगळ्या दराने डेंग्यू चाचणी करत होते. अनेक प्रयोगशाळेत खूप जास्त शुल्क आकारले जात होते पण आता सर्व प्रयोगशाळांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहारमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रातही डेंग्यू, मलेरियासह हंगामी आजारांनी कहर केला आहे. डेंग्यूचे डास स्वच्छ आणि अस्वच्छ पाण्यात प्रजनन करतात. त्याचबरोबर मलेरियाचे डासही गलिच्छ पाण्यात प्रजनन करतात.

महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहारमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रातही डेंग्यू, मलेरियासह हंगामी आजारांनी कहर केला आहे.
Covid 19: भारत बायोटेकची नेजल वॅक्सीन लवकरच येणार; एम्समध्ये ट्रायल सुरु

केंद्राने प्रतिबंधावर दिला भर

केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून डेंग्यूसारख्या वेक्टर-जनित रोगांच्या प्रतिबंधासाठी गतिविधी वेगवान करण्यावर भर दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सोमवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि प्रशासकांना लेखी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पत्रात, आरोग्य सचिवांनी म्हटले आहे की, संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यासाठी कीट विज्ञान पर्यवेक्षण करणे, संसर्ग कमी करण्याचे उपक्रम आणि जलद वेक्टर नियंत्रण उपाय लागू केले पाहिजेत.

आरोग्य सचिवांनी सांगितले की, मागील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये डेंग्यूसारख्या वेक्टर-जनित रोगांच्या (VBD) प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. ते म्हणाले की, या रोगांचा प्रसार पर्यावरणीय घटकांद्वारे होतो. वेक्टर स्प्रेडसाठी अनुकूल वातावरणामुळे पावसाळ्यात आणि मान्सूननंतरच्या काळात त्यांचा प्रसार जास्तीत जास्त असतो. आरोग्य सचिव म्हणाले, 'या आजारांना दूर करण्यासाठी, डासांची संख्या कमी करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com