'100 करोड द्या अन् खासदार व्हा', फसवणूक करणाऱ्या टोळीचा CBI ने केला पर्दाफाश

CBI Busts Racket: अलीकडेच अनेक ठिकाणी छापे टाकून टोळीतील चार जणांना अटक केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
CBI
CBI Dainik Gomantak

CBI Busts Racket: राज्यसभेची जागा आणि राज्यपालपद मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन 100 कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या आंतरराज्य टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने अलीकडेच अनेक ठिकाणी छापे टाकून टोळीतील चार जणांना अटक केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिमेदरम्यान एक आरोपी सीबीआय (CBI) अधिकाऱ्यांवर हल्ला करुन पळून जाण्यात यशस्वी झाला. अधिकार्‍यांवर हल्ला केल्याप्रकरणी फरार आरोपींविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात वेगळा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

CBI
Monsoon Session: काँग्रेसच्या चार खासदारांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन

आरोपी कोण?

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीबीआयने एफआयआरमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) लातूर जिल्ह्यातील रहिवासी कमलाकर प्रेमकुमार बंडगर, बेळगावचे रहिवासी रवींद्र विठ्ठल नाईक आणि दिल्लीचे (Delhi) रहिवासी महेंद्र पाल अरोरा, अभिषेक बुरा आणि मोहम्मद एजाज खान यांची नावे दिली आहेत.

दरम्यान, एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, बंडगर हा सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत असे. तर दुसरीकडे, बुरा, अरोरा, खान आणि नाईक आपले उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी संबंध असल्याचे सांगत.

CBI
राज्यसभेतून 12 खासदारांचे निलंबन

एफआयआरमध्ये काय आहे?

एफआयआरनुसार, "राज्यसभेत जागा मिळवून देऊ, राज्यपालपदी नियुक्ती आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध सरकारी संस्थांचे अध्यक्षपद मिळवून देऊ, असे खोटे आश्वासन देऊन सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा आरोपींचा हेतू होता.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com