CBI Summoned Satya Pal Malik: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना चौकशीसाठी सीबीआयचे समन्स

एजन्सीने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता.
CBI Summoned Satya Pal Malik
CBI Summoned Satya Pal MalikDainik Gomantak

CBI Summoned Satya Pal Malik: भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना तोंडी समन्स पाठवले आहे.

त्यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास एजन्सीने सांगितले आहे. यासंदर्भात सीबीआयने अद्याप दुजोरा दिलेला नाही.

एजन्सीने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सीबीआयने त्यांना पाचारण केले आहे. दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा मलिक यांनी केला होता. सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्याची चौकशी केली होती.

चार राज्यांचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक यांनी 'द वायर' या न्यूज वेबसाईटचे ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीने देशात मोठी खळबळ निर्माण केली.

मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासाठी केंद्र सरकारलाच जबाबदार धरत, भ्रष्टाचाराबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

CBI Summoned Satya Pal Malik
Air India: मैत्रीसाठी काहीपण? पायलटने कॉकपिटमध्ये बसवले मैत्रिणीला; तिथेच केली जेवण, दारूची सोय

सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास

1989 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. सत्यपाल मलिक यांनी यूपीच्या अलीगड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच लोकसभेत गेले. 1996 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि अलीगडमधून निवडणूक लढवली.

2005-2006 मध्ये ते उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष, 2009 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे अखिल भारतीय प्रभारी बनवण्यात आले.

2014 मध्ये बहुमताने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि 30 सप्टेंबर 2017 रोजी त्यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले. जवळपास 11 महिने बिहारचे राज्यपाल राहिल्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये त्यांची जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नोव्हेंबर 2019 ते ऑगस्ट 2020 पर्यंत ते गोव्याचे राज्यपाल होते आणि ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत ते मेघालयचे राज्यपाल होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com