CBSE Board Exam 2021: विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

CBSE Board Exam 2021: कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सीबीएसईच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी प्रात्यक्षिक परीक्षा देता येणार आहे. आता त्यांना प्रॅक्टिकल  परीक्षेची चिंता करण्याची गरज नाही.(CBSE Board Exam 2021 Students infected with the corona virus will be able to take a practical test at any time)

सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, ज्या विद्यार्थ्यांच्या चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत त्यांची प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलली जाईल आणि लेखी परीक्षा संपल्यानंतर घेण्यात येईल. तसेच, सीबीएसईने असे म्हटले आहे की एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला स्वतःला घरीच सेल्फ-आइसोलेशनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जाईल.

बेशिस्त प्रवाशांना विमान प्रवास बंदी: देशासह गोव्यातही मार्गदर्शक प्रणाली जाहीर 

विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा

एका अहवालानुसार सीबीएसई बोर्डाच्या या घोषणेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्ष परीक्षेच्या तारखा जवळ आल्या होत्या आणि दुसरीकडे, कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत होती. त्याचबरोबर कोलकातामधील बर्‍याच शाळांमध्ये 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर काही शाळा लवकरच प्रॅक्टिकल परीक्षा सुरू करणार आहेत.

भाजपच्या जाहीरनाम्यात चिदंबरम यांच्या सुनेच्या डान्सची क्लिप, व्हिडीओ व्हायरल 

परीक्षा केंद्रे बदलण्याचा पर्याय

सीबीएसईच्या या घोषणेमुळे अनेक शाळांना मोठा दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांवरील दबावही कमी होणार आहे. नुकतीच सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय जारी केला होता. सीबीएसईने नोटीस बजावून परीक्षा केंद्र बदलण्याची घोषणा केली हाती. यात सीबीएसईने म्हटले होते की, कोरोना कालावधीत बरेच विद्यार्थी पालकांसह इतर शहरांमध्ये गेले आहेत. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्याला दहावी आणि बारावीच्या परीक्षेला हजेरी लावायची असेल त्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी पुरेशी शिथिलता मिळू शकेल.

संबंधित बातम्या