CBSE Board: बारावीच्या परिक्षा रद्द

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 जून 2021

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील व्यक्त केली जात होती.

मागील काही दिवसांपासून देशात सुरु असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परिक्षांबाबतच्या(CBSE board) चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. यांसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी घेतेलेल्या बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची परिक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी केली जात होती.  कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांच्या (students)आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासोबतच, मागील वर्षीप्रमाणेच यंदाही ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल, त्यांना जेव्हा कोरोनाची परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. असं देखील सांगण्यात आले आहे. 

यूपी: शालेय अभ्यासक्रमात योगी आणि रामदेव बाबांचे धडे

दरम्यान, परीक्षा होत नसल्यामुळे आता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण होणार असून त्यासंदर्भात सीबीएसई बोर्ड निश्चित कशा मानकांच्या आधारे नियोजित वेळ ठरवून त्यानुसार मूल्यमापन करुन निकाल जाहीर करेल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल, बारावीचा निर्णय लांबणीवर

दरम्यान, हा निर्णय घेत असताना पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. “विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत सीबीएसई 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा यालाच या कोरोना काळात सर्वाधिक प्राधान्य असेल. त्याविषयी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला ताणतणाव संपुष्टात यायला हवा. अशा प्रकारचं तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी  बसण्याची सक्ती करण्यात येऊ नये. सर्व संबंधितांनी या गोष्टीकडे संवेदनशीलतेने पाहायला हवे”, असं म्हणत पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे.
 

संबंधित बातम्या