CBSE: असे होणार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन

CBSE: असे होणार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन
Supreme court

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCI) आज सर्वोच्च न्यायालयात इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन प्रणाली सादर केली असून अॅटर्नी जनरल (एजी) के के वेणुगोपाल यांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या या मूल्यांकन प्रणालीबाबत येत्या  31 जुलै रोजी  न्यायालय अंतिम निकाल  जाहीर करणार आहे. (CBSE to declare results on the basis of class 10th and 11th exam)

दरम्यान देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्याच्या द्रुष्टीने  देशभरात दहावी - बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती . काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारतफे परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र विद्यार्थ्याच्या निकालाबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय शिक्षण  मंडळाच्या वतीने  13  सदस्यांची एक समिती गठीत कऱण्यात आली होती. आता याच  समितीने हा मूल्यमापनाचा फॉर्म्युला सादर केला आहे.

जाणून घेऊयात की सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या मूल्यांकन मूल्यांकनाचे मुख्य मुद्दे नेमके कोणते आहेत...

- एखाद्या विद्यार्थ्याचे मूल्यांकन करण्यासाठी, दहावी आणि अकरावीचे प्रत्येकी 30% आणि 12 वीचे 40% असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. 

- म्हणजेच विद्यार्थ्यानी इयत्ता १०वी मध्ये केलेल्या कामगिरीवर 30 टक्के मार्क, 11 वी मध्ये केलेल्या कामगिरीवर 30 टक्के मार्क आणि 12 वी मध्ये केलेल्या  शैक्षणिक वर्षाच्या कामगिरीवर 40 टक्के गुण देण्यात येतील . 

- यावेळी  मूल्यांकनासाठी सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येणार आहे.

- यावेळी मूल्यांकन करताना 30 टक्के गुण असतील ते 11  वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित तसेच  उरलेले 40  टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि प्रिलिम  परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com