CBSE, ICSE 12th Exams : सुप्रीम कोर्टाचा परिक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब!

court 3.jpg
court 3.jpg

देशात कोरोनामुळे (covid19) निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने (Government of India) CBSE आणि ICSE च्या दहावीच्या परिक्षांसोबतच बारावीच्या परिक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र या निर्णयाविरुध्द सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर IIT-JEE किंवा CLAT यासारख्या परिक्षा ऑफलाईन पध्दतीने होऊ शकत असतील तर बारावी बोर्डाच्या परिक्षा का होऊ शकत नाहीत? असा न्यायालयात याचिकाकर्त्याने विचारला आहे. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत परिक्षा रद्द करण्याचा भारत सरकारचा आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डाचा निर्णय योग्यच असल्यावर शिक्कामोर्तब केला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठीच्या पध्दतीला आव्हान देणारी याचिका देखील न्यायालयाने यावेळी फेटाळून लावली आहे. (CBSE ICSE 12th Exams Supreme Court seals cancellation of exams)

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर (A.M. Khanwilkar) आणि न्यायमूर्ती दिनेश मागहेश्वरी (Dinesh Magheshwari) यांच्या खंडपीठासमोर सुनवाणी झाली. अंशुल गुप्ता (Anshul Gupta) यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्याशिवाय, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) शिक्षक संघटनेनं बोर्डाकडून स्वीकारण्यात आलेल्या पध्दतीला आव्हान देण्यात आले होते. ती याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही!
दरम्यान, न्यायालयाने परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे यावेळी सांगितले आहे. आम्हाला असं वाटत की, CBSE आणि ICSE या दोन्ही बोर्डांनी घेतलेल्या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. हा निर्णय घेण्यामागे विद्यार्थ्यांचं हीत लक्षात घेण्यात आलं आहे. भारत सरकार आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डांकडून हा निर्णय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर घटकांचा विचार करुन घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय देणार नाही, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले आहे.

''इतर संस्था परिक्षा घेतात म्हणून बोर्डाने देखील परिक्षा घ्यायला हव्यात हा दावा मान्य करता येणार नाही. व्यापक अशा जनहिताचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईनं 13 तज्ञांच्या समितीनमार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे,'' असं देखील न्यायालयानं नमूद केले. 

12 वी च्या विद्यार्थ्यांचं कसं होणार मूल्यमापन?
मूल्यमापनाच्या पध्दतीनुसार, तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना कामगिरीनुसार 30 मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये उत्तम गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर 30 टक्के गुण असतील ते 11 वीच्या अंतीम परिक्षेमध्ये केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले 40 टक्के गुण हे बारावीच्या इयत्तेमध्ये घेतलेल्या चाचणी परिक्षा, सत्र परिक्षा आणि Prelim परिक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येणार आहेत. दहावीचा निकाल 20 जुलैला आणि बारावीचा निकाल 31 जुलैला लावण्याचा प्रयत्न असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com