सीबीएसई उत्तरपत्रिकांची शाळांमध्ये तपासणी

Dainik Gomantak
सोमवार, 11 मे 2020

देशातील तीन हजार सीबीएसई संलग्न शाळा केवळ पेपर तपासणीसाठी सुरू केल्या जातील.

नाशिक

केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या देशातील तीन हजार शाळा मूल्यमापन केंद्र म्हणून सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. सीबीएसईद्वारे झालेल्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे वेळेत मूल्यमापन होऊन निकाल लावता यावा, यासाठी ही परावानगी देण्यात आली आहे. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी मंजुरीबद्दल गृहमंत्रालयाचे आभार मानले. देशातील तीन हजार सीबीएसई संलग्न शाळा केवळ पेपर तपासणीसाठी सुरू केल्या जातील, असे त्यांनी म्हटले आहे. दीड कोटी उत्तरपत्रिकांचे लवकरच मूल्यमापन होईल, अशी अपेक्षा व्यक्त करून मंडळाचे उर्वरित पेपर झाल्यावर दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील आणि हे पेपर 1 ते 15 जुलैला होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या