सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी आज सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी आज सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. शिक्षा मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी सीबीएसईच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करताना, मंडळाने माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक वर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रत्येक बाबी विचारात घेतल्या असल्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी शुभेच्छा देत, सर्व विद्यार्थ्यांनी कठीण काळात चांगला प्रयत्न केला असल्याचे सांगितले.    

सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षांची सुरवात 4 मे ला ओडिया / कन्नड़ / लेप्चा या पेपर पासून सुरवात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 7 जूनला कॉम्पुटर अप्लिकेशनच्या पेपर नंतर संपणार आहे.       

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक - 
4 मे  - ओडिया / कन्नड़ / लेप्चा
6 मे  - इंग्रजी भाषा व साहित्य 
10 मे - हिंदी ए आणि बी 
11 मे - उर्दू, बंगाली व अन्य भाषा 
12 मे  - पंजाबी, जर्मन 
13 मे  - मल्याळम, फ्रेंच, रशियन आणि उर्दू ब 
15 मे  - विज्ञान थेरी व प्रॅक्टिकल 
17 मे  - पेंटिंग 
18 मे  - एनसीसी, संगीत 
20 मे - होम सायन्स 
21 मे  - गणित स्टॅंडर्ड आणि बेसिक्स 
22 मे  - जपानी, एलीमेंट्री ऑफ बिजनेस, कार्नेटिक संगीत 
25 मे  - क्षेत्रीय आणि विदेशी भाषा
27 मे - सोशल सायन्स 
29 मे  – इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इंट्रोडक्शन टू टुरिजम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स 
31 मे  – रिटेल आणि अन्य स्किल कोर्स
2 जून – अरबी आणि संस्कृत
7 जून – कॉम्पुटर अ‍ॅप्लिकेशन

बारावीचे वेळापत्रक - 
4  मे  - इंग्रजी इलेक्टिव आणि इंग्रजी कोर
5  मे  - टॅक्ससेशन, कार्नेटिक संगीत, भारतीय संगीत 
6 मे - नॉलेज ट्रॅडीशन अँड प्रक्टिसेस ऑफ इंडिया, नेपाळी, ऑटोमोटिव, फायनान्शियल अँड मार्केट मॅनेजमेंट, इन्शुरन्स, इलेक्ट्रॉनिक टेक्नोलॉजी, मेडिकल डाइग्नोस्टिक्स, कुचीपुड़ी - डान्स, ओडिसी – डान्स 

8  मे  - फिजिकल एजुकेशन
10  मे -  इंजीनियरिंग ग्राफिक्स, फूड प्रॉडक्शन, मीडिया, शॉर्ट हॅन्ड (इंग्रजी), टेक्सटाइल डिजाइन

11  मे  - टाइपोग्राफी आणि कॉम्पुटर अ‍ॅप्लिकेशन, फॅशन स्टडीज
12  मे  - बिजनेस स्टडीज, बिजनेस ऐडमिनिस्ट्रेशन
13  मे  - फिजिक्स, अ‍ॅप्लाईड फिजिक्स
15  मे - सकाळी - मास मीडिया स्टडीज आणि दुपारी - तामिळ, तेलुगू, सिंधी, गुजराती, मणिपुरी, मल्याळम, उड़िया, आसामी, कन्नड़, तिबेटी, जर्मन, रशियन, लिंबो, लेप्चा, बोडो, टंगखुल, भूटिया, स्पॅनिश, मिजो 

17  मे  - अकॉउंटस 
18  मे - केमिस्ट्री
19  मे  - पॉलिटिकल सायन्स 
20  मे  - लीगल स्टडीज, उर्दू कोर, सेल्समनशिप 
21 मे - दुपारी - उर्दू इलेक्टिव, संस्कृत इलेक्टिव, संस्कृत कोर, फ्रंट ऑफिस ऑपरेशन्स, एयर-कंडीशनींग आणि रेफ्रिजनेशन, डिजाईन 

22  मे  - हेल्थ केयर, पेंटिंग, स्कल्प्चर, अ‍ॅप कॉमर्शियल आर्ट
24  मे  - बायोलॉजी, ऑफिस प्रोसीजर्स आणि प्रॅक्टिस 
25  मे  - इकॉनॉमी 
27 मे - सकाळी फ्रेंच आणि दुपारी आर्किटेक्स्चर, इलेक्ट्रकिल टेक्नोलॉजी, कॉस्ट अकाउंटिंग, शॉर्टहॅन्ड (हिंदी), संगीत प्रॉडक्शन, फूड न्यूट्रिशन आणि  डाइलेक्टिक्स, अर्ली चाइल्डहुड केयर आणि एज्युकेशन 

28  मे  - सोशियोलॉजी
29 मे  - इंफॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस (न्यू), कॉम्पुटर सायन्स (न्यू), इंफॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस (ओल्ड), कॉम्पुटर सायन्स (ओल्ड), इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी

31  मे  - हिंदी इलेक्टिव आणि हिंदी कोर
1 जून - मॅथ्स और अ‍ॅप्लाय मॅथ्स 

केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी यापुर्वी जाहीर केल्यानुसार मंगळवारी सीबीएसईच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणावमुक्त होऊन तयारी करता यावी, यासाठी दोन पेपरमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यात आले आहे. मानसिक तणाव होऊन नये, या दृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या