पत्रकारांच्या अटकेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल तेलंगणात उडाली खळबळ

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

हैदराबादमध्ये(hyderabad) अटक झालेल्या पत्रकाराचे(journalist) सीसीटीव्ही(CCTV) फुटेज व्हायरल होत आहे. पत्रकारांच्या संघटना आणि विरोधी पक्षांनी असा आरोप केला आहे की सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांनी पत्रकाराशी गैरवर्तन केले.

तेलंगना: हैदराबादमध्ये(hyderabad) अटक झालेल्या पत्रकाराचे(journalist) सीसीटीव्ही(CCTV) फुटेज व्हायरल होत आहे. पत्रकारांच्या संघटना आणि विरोधी पक्षांनी असा आरोप केला आहे की सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांनी पत्रकाराशी गैरवर्तन केले आणि भरदिवसा जबरदस्तीने त्याला पळवून नेले. व्हायरल व्हिडिओमध्ये पत्रकाराचे नाव रघु रामकृष्ण असल्याचे सिद्ध झाले आहे. सूर्यापेटचे जिल्हा पोलिस अधीक्षक आर भास्करन यांनी सांगितले की, रघुला मत्थापल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 20/21 अंतर्गत अटक करण्यात आली होती. रघुच्या पत्नीने उच्च न्यायालयात या प्रकरणाबाबत अपील केली आहे. आम्ही कायद्यान्वये आवश्यक असणारी कारवाई करू आणि उच्च न्यायालयासमोर रघूला सादर करू.(CCTV footage of Telangana journalists arrest goes viral)

Farmer protest:आंदोलक शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा होणार बातचीत

तेलंगानाचे आमदार दानसारी अनसूया यांनी अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक छोटा सीसीटीव्ही फुटेज शेअर केला असून त्यामध्ये पत्रकार रस्त्यावर खरेदी करत होता. नंतर अचानक सिव्हिल ड्रेसमधील दोन माणसे तेथे आले आणि काही सेकंद ते रघुच्या मागे उभे राहले. त्याला जबरदस्तीने पकडून मागे पार्क केलेल्या पांढऱ्या कारमध्ये बसवून घेवून गेले. ज्या गाडीतून रघूला नेण्यात आले ती पोलिसांची गाडी नव्हती ती एक खासगी कार असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या प्रकरणी कारवाई केली जाईल
पत्रकार रघु यांच्याशी पोलिसांच्या असभ्य वर्तन आणि जबरदस्तीबद्दल विचारले असता एसपी म्हणाले की, या प्रकरणात आवश्यक ती कारवाई केली जाईल. पत्रकार रघुच्या अटकेच्या व्हायरल व्हिडिओवरून तीव्र प्रतिक्रिया व संताप स्थानिक लोकांमधून व्यक्त केला जात आहे. प्रदेशातील पत्रकार संघटना आणि राजकीय पक्षांनी या अटकेचा निषेध केला आणि राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला.

धक्कादायक! भाजप नेत्याच्या मुलीवर अत्याचार

अपहरण की अटक?
अनुसूया यांनी 8 जून रोजी सीसीटीव्ही फुटेजसह ट्वीट केले आणि लिहिले की," हे अपहरण आहे की अटक? जर आपण आवाज उठवला तर तेलंगणा सरकार तुमच्याशी असे वागेल." दरम्यान, तेलंगणा उच्च न्यायालयाने राज्याच्या महासंचालकांना 14 जून रोजी किंवा त्यापूर्वी रघुंच्या प्रकरणातील तपशील सादर करण्यास सांगितले आहे.
 

संबंधित बातम्या