"सायबर तंत्रज्ञानात मोठी गुंवणूक केल्याने चीन सक्षम आहे"

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

एखाद्या देशाला सुरक्षित असणार्यांसाठी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स सोबत आता सायबर सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची झाली आहे. त्यामुळे या सायबर सुरक्षिततेमध्ये आपली ताकद वाढवण्याचा भारत देखील प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आहे.

एखाद्या देशाला सुरक्षित असणार्यांसाठी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स सोबत आता सायबर सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची झाली आहे. त्यामुळे या सायबर सुरक्षिततेमध्ये आपली ताकद वाढवण्याचा भारत देखील प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना "चीन भारताविरुद्ध सायबर हल्ले करण्यास सक्षम असून, तंत्रज्ञानाचा विचार केला तर दोन्ही देशांच्या तंत्रज्ञानाच्या ताकदीमध्ये देखील फरक आहे." असे मत सेना दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिल्लीस्थित विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे. (CDS Gen Bipin Rawat said China has invested a lot of funds to imbibe technology)

मी सीआरपीएफचा आदर करते, पण भाजपच्या सीआरपीएफचा नाही: ममता बॅनर्जी
सायबर डोमेनच्या क्षेत्रात भारत आणि चीनमध्ये मोठा फरक असून, चीन तंत्रज्ञानांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो आहे. आणि त्यामुळेच  तंत्रज्ञान क्षेत्रात चीन भारतापेक्षा पुढे आहे. त्यामुळे चीन भारतावर सायबर हल्ला करून शकतो किंवा सायबर हल्ला करण्यास सक्षम आहे असे मत जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केले आहे. यावर बोलताना, आम्हाला माहिती आहे की चीन आपल्यावर सायबर हल्ले करण्यास सक्षम आहे आणि यामुळे आमच्या सिस्टमला मोठ्या प्रमाणात व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे आम्ही सायबर संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी उत्तम यंत्रणा करतो आहोत, असे जनरल बिपीन रावत यांनी स्पष्ट केले आहे. 

सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी फायरवॉल (Firewall) बांधणे हे आमचे उद्दीष्ट असून, या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याचे जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांनी सांगितले. त्यामुळे भू-सीमा, सागरीसीमा आणि हवाई संरक्षणासोबतच सुरक्षा यंत्रणा आता सायबर सुरक्षा (Cyber Security of India) देखील वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे.  

संबंधित बातम्या