Monkeypox Virus
Monkeypox VirusDainik Gomantak

'Monkeypox'च्या मुद्द्यावर केंद्राचे राज्य सरकारला निर्देश, जगभरात आढळली 3413 प्रकरणे

आरोग्य सचिवांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली: मंकीपॉक्स विषाणूच्या (Monkeypox) मुद्द्यावर, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी पत्र लिहिले आहे. आणि या संदर्भात पुरेशी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले की, 'जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, यावर्षी 1 जानेवारी ते 22 जून या कालावधीत जगभरातील 50 देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची 3413 प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बहुतेक प्रकरणे युरोपियन देशांमध्ये आढळली आहेत. हा विषाणू हळूहळू जगभर पसरत आहे. त्यामुळे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन आपण सतर्क राहून या आजाराविरुद्ध आपली तयारी पूर्ण केली पाहिजे.'

Monkeypox Virus
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांना ईडीने केली अटक; 4 दिवसांची कोठडी
Monkeypox
MonkeypoxGovernment

केंद्र सरकारने सांगितले की, सर्व संशयितांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांची चाचणी केली जावी आणि चांगली पाळत ठेवण्याची व्यवस्था असावी. बाधित आणि संशयित रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवावे लागेल. तसेच, मंकीपॉक्सच्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णासाठी अधिक चांगली उपचार व्यवस्था असावी, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले.

साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी रुग्णालयांमध्ये पुरेशा कर्मचारी आणि साधनसामग्रीची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागले तर आरोग्य यंत्रणा सतर्क राहील. मंकीपॉक्स विषाणू ओळखण्यासाठी आवश्यक यंत्रणा रुग्णालयांमध्ये असावी. देश आधीच कोरोना महामारीशी संबंधित आव्हानांना तोंड देत असल्याचा पुनरुच्चार करत नागरी आरोग्य सेवांबाबत सतर्क राहण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले.

Monkeypox Virus
कार्यकर्ते लागले तयारीला...मुर्मूंचा विजय होताच दीड लाख गावांमध्ये भाजप करणार जंगी सेलिब्रेशन

या विषयावर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुरेशी आणि प्रभावी पावले उचलली पाहिजेत तसेच आरोग्य सेवांसाठी चांगली तयारी ठेवावी, असे केंद्राने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com