केंद्राचे बैठकीसाठी जम्मू काश्मीरमधील 14 नेत्यांना आमंत्रण

MODI N.jpg
MODI N.jpg

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली 24 रोजी होणाऱ्या बैठकीसाठी पूर्वाश्रमीच्या जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) राज्याच्या चार मुख्यमंत्र्यासह सध्याच्या केंद्र शासित प्रदेशातील 14 नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुढील कार्यवाहीच्या बाबतीत विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीसाठी या नेत्यांना आमंत्रित करण्यासाठी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला (Ajay Bhalla) यांनी त्यांच्याशी संवाद साधला, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad), पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती या जम्मू काश्मीरच्या चार मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. तसेच कॉंग्रेसचे नेते तारा चंद, भाजपचे नेते निर्मल सिंह, पीपल्स कॉन्फरन्सचे मुझफ्फर हुसेन बेग आणि कविंदर गुप्ता या माजी उपमुख्यमंत्र्यांनाही बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. (Center invites 14 leaders from Jammu and Kashmir for meeting)

याशिवाय, जम्मू काश्मीर अपना पक्षाचे प्रमुख अल्ताफ बुखारी, पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन, जे के कॉंग्रेसचे प्रमुख जी.ए.मीर, माकपचे नेते मोहम्मद युसुफ तारिगामी, भाजपचे रविंदर रैना आणि पॅंथर्स पक्षाचे नेते भीम सिंह यांचाही आमंत्रित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे.

भारत सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा (Special status) रद्द करुन केंद्र शासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदा होऊ घातलेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याबरोबर इतर केंद्रीय नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com