केंद्राने ट्विटरचा आयटी ऍक्ट पालनाचा दावा फेटाळला

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 मे 2021

डिजिटल माध्यमांवरील आयटी नियमांवर बंदी घातलेली नसले तर ट्विटरने त्यांचे पालन केले पाहिजे.

केंद्र सरकार आणि ट्विटर (Twitter) यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. सोशल मिडियावरील नव्या कायद्यावरील सुनावणीदरम्यान ट्विटटर आणि सरकार पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. सरकारने बनवलेल्या कायद्यांचे पालन केले असल्याचे ट्टिटरने उच्च न्यायालयात (High Court) सांगितले आहे. मात्र केंद्राने ट्विटरने कोणत्याही प्रकारे आयटी कायद्याचे पालन केले नसल्याचे सांगितले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार(Central Government) आणि ट्विटरला सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे(social media platforms) आयटी नियमांचे पालन करण्यासाठी याचिकेवर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. यावर ट्विटरच्या उच्च अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की सरकारने आयटी नियम 2021 मध्ये लागू केले आहेत. (The Center rejected Twitters claim of compliance with the IT Act)

यासोबत, ट्विटरने पुढे म्हटले की, भारतात स्थानिक अधिकाऱ्यांची नेमणूकही 28 मे पासून झाली आहे. हा अधिकारी स्थानिक तक्रारींचे निवारण करणार आहे. ट्विटरच्या या उत्तरावर केंद्र सरकारने म्हटले की, ट्विटरने नवे नियम लागू केले नाहीत. त्यावर न्यायालयाने म्हटले की, डिजिटल माध्यमांवरील आयटी नियमांवर बंदी घातलेली नसले तर ट्विटरने त्यांचे पालन केले पाहिजे.

भारतातील 'या'' मुख्यमंत्र्यांच्या कामाची 'युनायटेड नेशन्स...

दिल्ली उच्च न्यायालयात(Delhi High Court) शुक्रवारी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, तक्रारीच्या निवारणासाठी स्थानिक अधिकाऱ्यांची केंद्र सरकारच्या आयटी कायद्याच्या नियमांचे ट्विटरने पालन केले नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब न करता या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी विनंती केली गेली आहे.

प्रोटोकॉलसंबंधीच्या याचिकेवर सुनावणीस नकार; याचिकाकर्त्याला 25 हजाराचा दंड

अमित आचार्य(Amit Acharya) यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले की, आयटी कायदा 2 फेब्रुवारीपासून अंमलात आला केंद्राने ट्विटरसहित सगळ्या प्लॅटफॉर्मला त्यांचे पालन करण्यासाठी तीन महिने दिले आहेत. हा कालावधी 25 मे रोजी तीन महिन्याचा कालावधी संपला. परंतु ट्विटरसंदर्भात तक्रारींचा शोध आत्तापर्यंत तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली नाही.

पुढे आचार्य यांनी म्हटले की, जेव्हा त्यांनी काही ट्विटविषयी तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्यांना सरकारी नियमांचे पालन न केल्याबद्दल समजले.

संबंधित बातम्या