लस वितरणासाठी समित्या नेमणार : केंद्र सरकार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

कोरोनावरील प्रस्तावित लशीच्या वितरण प्रणालीत समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या कार्यकक्षेत एक मुख्य समिती स्थापन करावी  तसेच अन्य किमान दोन समित्या नेमाव्यात अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

नवी दिल्ली :  कोरोनावरील प्रस्तावित लशीच्या वितरण प्रणालीत समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या कार्यकक्षेत एक मुख्य समिती स्थापन करावी  तसेच अन्य किमान दोन समित्या नेमाव्यात अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. देशातील १३० कोटी नागरिकांपर्यंत लस पोचविण्यासाठी किमान एक वर्ष लागेल असा मंत्रालयाचा अंदाज आहे. 

मंत्रालयाने राज्यांना पाठविलेल्या पत्रात, लसीकरण सुरू झाल्यावर त्याचा इतर रुग्णांच्या उपचारांवर कमीत कमी प्रभाव पडेल यासाठी ही समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरणाबाबत बैठका घेण्यास सुरवात केली आहे.

संबंधित बातम्या