केंद्राकडून राज्यांना 5.86 लाख डोस विनामूल्य देणार ; केंद्र सरकार

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

देशभरात कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने सुरू झाली आहे.  या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेबाबत आज आपली योजना जाहीर केली आहे.

नवी दिल्ली :  देशभरात कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने सुरू झाली आहे.  या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेबाबत आज आपली योजना जाहीर केली आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या वितरणासंबंधी संपूर्ण माहिती दिली आहे. यानुसार, केंद्रसरकारकडून सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरविण्यात आलेल्या आगाऊ साठ्यानुसार 1 मे 2021 ते 15 जून 2021 या 45 दिवसांच्या कालावधीत एकूण 5 कोटी 86 लाख 29 हजार मात्रा राज्यांना विनामूल्य पुरविण्यात येतील असे नमूद करण्यात  आले आहे.  त्याचबरोबर  लस उत्पादकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून 2021 अखेर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून थेट खरेदीसाठी एकूण 4,87,55,000 डोस देखील उपलब्ध होतील. (The Center will provide 5.86 lakh doses free of cost to the states; Central Government) 

1 जून पूर्वीच मॉन्सून केरळला धडकणार;  हवामान विभागाचे  पूर्वसंकेत

दरम्यान, देशभरात 1 मे 2021 पासून देशव्यापी कोविड 19 लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत दरमहा एकूण केंद्रीय औषध प्रयोगशाळेच्या (सीडीएल) मान्यताप्राप्त 50%  लसीच्या मात्रा केंद्र सरकार खरेदी करणार आहे. त्यानंतर  केंद्र सरकार त्या लसी  विनामूल्य राज्य सरकारांना उपलब्ध करुन दिल्या जातील. याशिवाय,  दरमहा शिल्लक सीडीएलच्या 50%  मात्रा राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी थेट खरेदीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील.   केंद्रीय आरोग्य मंत्रालय पंधरा दिवसांच्या कालावधीत  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवायच्या कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रांच्या उपलब्धतेबाबत  आणि राज्य व खासगी रुग्णालयांना थेट खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या मात्रांबाबत आगाऊ माहिती देत आहे.

Cyclone Tauktae: वादळामुळे अरबी समुद्रात अडकलेल्या 34 जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना मे 2021 दरम्यान आणि जून 2021 च्या पहिल्या पंधरवड्या दरम्यान कोविड लसींच्या मात्रांचे केंद्र सरकारकडून वाटप (जे विनामूल्य उपलब्ध आहे) तसेच याच कालावधीसाठी राज्य व खासगी रुग्णालयांना   थेट खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या मात्रांबाबत पत्र लिहून कळवले आहे. या आगाऊ माहितीमुळे राज्यांना लसीकरणाचे अधिक चांगल्या प्रकारे आणि परिणामकारकपणे नियोजन करता येईल. 

याबाबत  जून 2021 पर्यंत होणाऱ्या लसीच्या पुरवठय़ांसंबंधी वरील माहिती तसेच लसीकरण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उपलब्ध मात्रांचा योग्य वापरासाठी राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत:

1.  जिल्हानिहाय आणि कोविड लसीकरण केंद्रनिहाय कोविड -19  लस व्यवस्थापन   योजना तयार करणे.

2.  मोठ्या प्रमाणावर योजनेचा प्रसार आणि जनजागृती करण्यासाठी  विविध माध्यमांचा  वापर करणे.

3.  राज्य सरकारे आणि खासगी लसीकरण केंद्रांना कोवीन डिजिटल प्लॅटफॉर्मवर लसीकरण वेळापत्रक आगाऊ प्रकाशित करणे 

4.  राज्ये आणि खासगी लसीकरण केंद्रांनी  एका दिवसाचे  लसीकरण वेळापत्रक प्रकाशित करू नये 

5.  लसीकरण केंद्रांवर  जास्त गर्दी होऊ देऊ नये 

6.  कोविनवर लसीकरणासाठी वेळ घेण्याची प्रक्रिया सुलभ असावी. 

संबंधित बातम्या