केंद्र व राज्यसरकारांनी पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करावा; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला 

केंद्र व राज्यसरकारांनी पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करावा; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला 
supreme court.jpg

नवी दिल्ली : देशातील कोरोनाव्हायरसची दुसरी  लाट नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना लॉकडाऊनवर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.  देशातील कोरोना रुग्णांच्या नव्या प्रकरणांमध्ये  4 लाखाने वाढ झाली आहे.  तसेच राज्यसरकारांनी लॉकडाऊन लावण्यापूर्वी याचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम कमी होईल, याचा विचार करून लॉकडाऊन लावावा. तसेच, ज्यांच्यावर यांचा परिणाम होऊ शकतो त्यांच्यासाठी काही विशेष व्यवस्था केली जावी, असेही न्यायालयाने राज्यसरकारांना सल्ला दिला आहे. इतकेच नव्हे तर  देशातील नागरिकांच्या हितासाठी आणि कोरोनाची लाट रोखण्यासाठी हा निर्णय लवकरात लवकर घेतला जावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.  (Central and state governments should re-impose strict lockdown; Supreme Court advice) 

गर्दी होण्याची ठिकाणे पूर्णपणे बंद करा  '
त्याचबरोबर, ज्या ठिकाणी संसर्ग होणीयहकी शक्यता सर्वाधिक असते अशा कार्यक्रमांचे आयोजन (सुपर स्प्रेडर प्रोग्राम) आणि गर्दी होण्यासारखी ठिकाणे पूर्णपणे बंद केली जावीत. लोकांच्या हितासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार लॉकडाउनचा विचार करू शकतात. 

लॉकडाऊनचा परिणाम होणाऱ्या नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करावी 
 गेल्या वर्षी मार्चमध्ये देशात कोरोना संसर्गाची सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. कोरोनाची साखळी तोडणे हा लॉकडाऊनचा  मुख्य उद्देश होता. मात्र लॉकडाऊनच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामाची आम्हाला माहिती आहे. विशेषत: दुर्लक्षित लोकांवर याचा वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे जर आता सरकारने लॉकडाउन लादले तर या लोकांना सुरक्षितता देण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. '

कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा अधिक प्राणघातक आहे
कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक संक्रामक आणि प्राणघातक आहे. दुसऱ्या लाटेत  लोक वेगाने संक्रमित होत आहेत. अशा परिस्थितीत वेळोवेळी राष्ट्रीय पातळीवर लॉकडाउन सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे, परंतु लॉकडाऊनला शेवटचा पर्याय म्हणून अंमलात आणण्याचा सल्ला पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारांना दिला आहे. तथापि, अनेक राज्यांनी लॉकडाऊन लादले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर केंद्र सरकार देशव्यापी लॉकडाऊनवर विचार करू शकेल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com