देशातील लसीकरण सुरळीत करण्यासाठी रेमडेसीवीर लसीची निर्यात थांबण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे.  केंद्रसरकारने परदेशात जाणाऱ्या रेमडेसीवीर लसीची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशातच देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूतही प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान, देशत जानेवारी महिन्यातच लसी कारण मोहीम सुरू झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेत लसींच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी अडथळा न इरमान झाला आहे. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.  अशातच आता या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. धक्कादायक बाब महजे अनेक ठिकाणी लसीकारण केंद्रे बंद पडली आहेत. तर काही ठिकाणी केवळ एक दिवस पुरेल इतकंच लसीचा साठा शिल्लक राहील आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे.  केंद्रसरकारने परदेशात जाणाऱ्या रेमडेसीवीर लसीची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. (Central Government decides to stop export of Remedesivir vaccine to streamline vaccination in the country) 

धक्कादायक! भाजपच्या कार्यालयात सापडले रेमडीसीवीरचे 5 हजार डोस

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे ठप्प पडली आहेत. त्यामुळे देशात कोरोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत रेमडेसीवीरच्या निर्यातीवरती पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर रेमडेसीवीरचं उत्पादन करणाऱ्या  स्थानिक कंपन्याना त्यांच्या वेबसाईटवर संपूर्ण साठ्याची माहिती टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच कंपन्या कोणत्या वितरकरांच्या माध्यमातून लस पुरवठा करतात याबाबत देखील माहिती देण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.  तसेच, औषध निरीक्षक व इतर संबंधित अधिकाऱ्यांना रेमडेसीवरच्या साठ्यावर सातत्याने लक्ष द्यावे लागणार आहे आणि काळाबाजार रोखण्यासाठी काय उपाययोजना जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे. 

तथापि, महाराष्ट्रात लसीअभावी लसीकरण केंद्रे बंद पडली असताना शेजरील राज्यात गुजरातमध्ये मात्र रेमडेसीवीरच्याचे  मोफत वाटप सुरू असल्याचं आढळून आलं आहे. देशात कोरोनाकहा उद्रेक झाला असताना केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाने देशातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या खासगी रूग्णालयांमधील या इंजेक्शनचा साठा पूर्णपणे संपलेला होता.  लसीकरण केंद्रे लसीअभवी ठप्प पडली होती. केवळ सरकारी रूग्णालयातच रेमडेसीवर उपलब्ध असल्याने  रूग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत होती.   मात्र या निर्णयाने सर्वानाच दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी इंजेक्शन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. यावेळी  राज्यात जाणवणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावर उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.  त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी जिल्हास्तरावर रेमडेसीवीरचा पुरवठा करण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश  राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी यांना दिले होते.  त्यानंतर त्यांनी राज्यात रेमडेसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. 

संबंधित बातम्या