सेंट्रल व्हिस्टाचे काम सुरु ठेवण्यावर केंद्र सरकार ठाम; न्यायालयात मांडली बाजू

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

केंद्राने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या सुरु असणाऱ्या कामावर आक्षेप घेणे म्हणजे कायद्याचा दुरुपयोग असल्याचे म्हटले आहे.​

कोरोना साथीच्या काळातच राजधानी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे (Central Vista Project) काम सुरू आहे. या प्रकल्पाचे काम कोरोना काळात  देखील सुरु असल्याने दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi HIghcourt) याचिका दाखल करण्यात आली होत. यावर आज केंद्र सरकारने (Central Government) कोर्टात आपली बाजू मांडली (Reply) आहे. यावेळी केंद्राने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या सुरु असणाऱ्या कामावर आक्षेप घेणे म्हणजे कायद्याचा दुरुपयोग असल्याचे म्हटले आहे. तसेच ही याचिका फेटाळून लावण्याची मागणीही केंद्राने कोर्टाकडे केली असल्याचे समजते आहे. आता कोर्टाने म्हटले आहे की उद्या या प्रकरणी बुधवारी सुनावणी होईल.(The central government defended itself in court over the Central Vista project)

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत...

केंद्र सरकारने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, "हा प्रकल्प थांबविण्यासाठी दाखल केलेली याचिका कायदेशीर प्रक्रियेचा सरळ गैरवापर आणि प्रकल्पाचे काम टांगणीवर टाकण्याचा आणखी एक प्रयत्न आहे." केंद्र सरकारने उच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना असेही सांगितले आहे की "19 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या डीडीएमएच्या आदेशानुसार ज्याठिकाणी मजूर हे बांधकामाच्या ठिकाणीच राहतात अशा बांधकामाची कामे सुरु ठेवता येणार आहे." पुढची सुनावणी बुधवारी होणार असल्याचे समजते आहे. 

दरम्यान, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातली ही याचक इतिहासकार सोहेल हाश्मी आणि ट्रान्सलेटर अन्या मल्होत्रा यांनी दाखल केली आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांना कोरोनाचा धोका आहे असे म्हणणे या याचिकेत याचिकाकर्त्यांनी मांडले आहे. तर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाला सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम रोखण्यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची विनंती करण्यात आली होती. 

संबंधित बातम्या