देशभरात 'फास्ट टॅग' द्वारे १०० टक्के टोलवसुलीची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवली

Central government extends deadline for toll collection through FASTags till 15th February 2021
Central government extends deadline for toll collection through FASTags till 15th February 2021

नवी दिल्ली :   केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी १ जानेवारीपासून देशभरातील सगळ्या टोलनाक्यांवर टोल वसुलीसाठी 'फास्ट टॅग' इलेक्ट्रॉनिक पद्धत बंधकारक असल्याचे जाहीर केले होते. मात्र या अंमलबजावणीची मुदत आता १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याच आल्याचे आज जाहीर करण्यात आले. फास्ट टॅग नसल्यास दंड आकारण्यात येणार आहे. 

याची सुरूवात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल मार्ग आणि मुंबई एन्ट्री पॉईंट आणि वरळी सा लिंक या महत्त्वाच्या टोलनाक्यांपासून होऊन, मग उर्वरित महाराष्ट्रातील टोलनाक्यावर अंमलबजावणी होणार आहे. टोलनाक्यांवरील गर्दी आणि गोंधळ कमी करण्यासाठी वर्षभरापूर्वी फास्ट टॅगचा निर्णय घेण्यात आला होता. फास्ट टॅग हे एका स्टिकर सारखे असून, ते गाडीच्या समोराल काचेवर लावतात. सध्या फास्ट टॅग असणाऱ्या गाड्यांसाठी टोलनाक्यांवर स्वतंत्र रस्त्यांची सोय आहे. या अंमलबजावणामुळे महामार्गांवरील गर्दी कमा होण्यास मदत होणार आहे.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com