केंद्र सरकारने दिले 74 कोटी लस खरेदी करण्याचे आदेश

दैनिक गोमंतक
मंगळवार, 8 जून 2021

आतापर्यंत असा कोठूनही डेटा मिळाला  नाही, किंवा जागतिक डेटा देखील नाही, कोरोनाचा मुलांवर अधिक परिणाम झाला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central government) 74 कोटी लस खरेदी (74 crore vaccines) करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल (Dr.VK Paul) यांनी दिली. तसेच कोरोनाची (Corona) तिसरी लाट कधी येऊ शकते त्याचा लहान मुलांवर परिणाम होईल का या सर्व प्रश्नांवर दिल्लीच्या ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) डॉ. रणदीप गुलेरिया (Dr.Randeep Guleria) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Central government orders purchase of 74 crore vaccines) 

डॉ. व्हीके पॉल म्हणाले, काही राज्यांनी गेल्या महिन्यात केंद्र सरकारने लसींची खरेदी करावी, अशी मागणी केली होती. केंद्राने कोविशिल्टच्या 25 कोटी आणि कोवाकिनच्या 19 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. त्याची 30 टक्के रक्कम सरकारने आगाऊ दिली आहे. केंद्र सरकारने एकूण 74 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. याबरोबरच ई-बायोलॉजिकल लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच्या 30 कोटी डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. असे डॉ. पॉल यांनी नमूद केले.  
मोदी सरकार करणार सरसकट सर्वांचे मोफत लसीकरण

डॉ. गुलेरिया म्हणाले, आतापर्यंत असा कोठूनही डेटा मिळाला  नाही, किंवा जागतिक डेटा देखील नाही, कोरोनाचा मुलांवर अधिक परिणाम झाला आहे. असे कोणताही पुरावा देखील नाही.आतापर्यंत जगात मुलांमध्ये कोविडच्या गंभीर संसर्गाचा कोणताही डेटा नाही. जागतिक आकडेवारी पाहिल्यानंतरही असे म्हणता येणार नाही की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना जास्त धोका आहे. तिसरी लाट थांबविण्यासाठी (CAB) कोविड रोखण्यासाठी असणारे नियम पाळवेत.

संबंधित बातम्या