केंद्र सरकारमुळे युवकांच्या हाती शस्त्रे

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

नजरकैदेतून बाहेर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच ठेवले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे युवक शस्त्र उचलत आहेत, असे विधान आज केले. 

श्रीनगर : नजरकैदेतून बाहेर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच ठेवले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे युवक शस्त्र उचलत आहेत, असे विधान आज केले. तसेच बिहारचे एक्झिट पोलचे निकाल पाहता राजदचे नेते तेजस्वी यादव यांना विधानसभेच्या निकालासाठी शुभेच्छा दिल्या.

 पत्रकार परिषदेत बोलताना मेहबुबा म्हणाल्या की, जम्मू काश्‍मीरमधून कलम ३७० काढल्यानंतर काश्‍मीरपेक्षा जम्मूची स्थिती अधिक बिकट बनली आहे. तेथे रोजगाराची स्थिती गंभीर बनली आहे. संपूर्ण जम्मू काश्‍मीर आणि लडाखच्या नागरिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. विरोध करणाऱ्या काश्‍मीरी युवकांना जबरदस्तीने तुरुंगात पाठवले जात आहे. त्यामुळे ते तुरुंगात जाण्यापेक्षा शस्त्रे हाती घेत आहेत. म्हणूनच भाजपच्या राजवटीत दहशतवादी कारवायात वाढ झाली, असा आरोप त्यांनी केला. 

जम्मू काश्‍मीरचा झेंडा जेवढा प्रिय आहे, तेवढाच देशाचाही ध्वजही. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, की अनुभव कमी असूनही आणि विरोधक असतानाही बिहारच्या राजकारणाची दिशा निश्‍चित 
केली. 

संबंधित बातम्या