'इराणी मंत्र्यांसोबतच्या बैठकीत प्रेषित मुहम्मदांचा मुद्दा आला नाही': केंद्र सरकार

इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान यांच्या भेटीत प्रेषित मुहम्मद यांच्यावरील वक्तव्याचा मुद्दा समोर आला नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
'इराणी मंत्र्यांसोबतच्या बैठकीत प्रेषित मुहम्मदांचा मुद्दा आला नाही': केंद्र सरकार
Amarinder BagchiTwitter/ANI

इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान यांच्या भेटीत प्रेषित मुहम्मद यांच्यावरील वक्तव्याचा मुद्दा समोर आला नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. प्रेषित मुहम्मद यांच्यावरील वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री यांच्या भेटीदरम्यान आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावर, बागची यांनी गुरुवारी मीडिया ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, "माझ्या समजुतीनुसार हे मुद्दे त्या संभाषणात उपस्थित केले गेले नाहीत." (Central Government Says Prophet Comment Issue Not Raised In Meeting With Iran Minister)

ते पुढे म्हणाले, "आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की ट्विट आणि वक्तव्य (प्रेषिताशी संबंधित) सरकारच्या विचारांचे प्रतिबिंब नाही." दुसर्‍या प्रश्नावर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, 'सरकार घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. सरकार (Government) प्रादेशिक अखंडतेवर काम करत आहे. सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी वाजवी उपाययोजना करत आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com