केंद्र सरकारला कमी दरात लसींचा पुरवठा करता येणार नाही; भारत बायोटेकचा खुलासा

केंद्र सरकारला कमी दरात लसींचा पुरवठा करता येणार नाही; भारत बायोटेकचा खुलासा
COVACCINE.jpg

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारला (Central Government) 150 रुपये प्रति डोस किमतीवर 'कोव्हॅक्सिन' (covaxin) लस  देता येणार नाही असे भारत बायोटेकने (Bharat Biotech) म्हटले आहे. कोरोनाविरुध्द कोव्हॅक्सिन वापरात आलेली पहिली भारतीय लस आहे. केंद्र सरकारने दिलेल्या दरामुळे खासगी क्षेत्रात किंमत वाढत असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. त्यामुळे मोदी सरकारला (Modi government) अल्पदरामध्ये कोरोना लसींचा पुरवठा करता येणार नाही असे भारत बायोटेकने म्हटले आहे. मागील आठवड्यामध्ये जेव्हा केंद्र सरकारने राज्यांच्या लसींच्या खरेदीचा 25 टक्के वाटा आपल्याकडे घेतला आहे. त्यानंतर आता लस निर्मिती कंपन्यांनी ही मागणी केली आहे. राज्य सरकारांना भारत बायोटेक प्रति डोस 400 रुपये आणि खासगी रुग्णालयामध्ये 1200 रुपये प्रति डोस दराने देत आहे. परंतु आता केंद्र सरकारने उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करेल, जे कंपनीला प्रति डोस 150 रुपयांना द्यावी लागणार आहे. (The central government will not be able to supply vaccines at low rates Bharat  Biotech Revealed)

खासगी क्षेत्रासाठी भारतात अन्य कोरोना लसींच्या तुलनेत कोव्हॅक्सिनसाठी अधिक किंमत योग्य असल्याचे म्हटले आहे. अत्यल्प प्रमाणात खरेदी, वितरणाची जास्त किंमत आणि किरकोळ नफा यासारखी अनेक मूलभत कारणे आहेत असे बायोटेकने म्हटले आहे. खासगी बाजारामध्ये खर्च पूर्ण करण्यासाठी जास्त किंमत ठेवणे आवश्यक ठेवणे आहे. आतापर्यंत भारत बायोटेकने लस विकास, क्लिनिकल चाचण्या तसेच कोव्हॅक्सिनसाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी 500 कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारत बायोटेक द्वारे लसीची उत्पादन क्षमता जुलै- ऑगस्टमध्ये 6-7 कोटी पर्यंत वाढेल, तसेच एप्रिलमध्ये दरमहा 10 दशलक्ष डोस. त्याचबरोबर सप्टेंबरपर्यंत सुमारे 10 कोटी लसीचे डोस पोहोचवणे आपेक्षित आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) मागील महिन्यामध्ये म्हटले होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com