कोरोना लसीकरणासंबंधी केंद्र सरकारची मोठी घोषणा; येत्या दोन आठवड्यात.. 

कोरोना लसीकरणासंबंधी केंद्र सरकारची मोठी घोषणा; येत्या दोन आठवड्यात.. 
rajesh bhushan.jpg

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली आहे.  देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली असून पुढील दोन आठवड्यांत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 100 टक्के लसीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. 1 एप्रिलपासून, देशात  कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत  आहे.  या टप्प्यात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस दिली जाईल. विशेष म्हणजे, कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांमध्ये 90 टक्के मृत्यू हे 45  पेक्षा जास्त वयोगटातील आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने नुकतीच एक बैठकीत दिली आहे. (Central Government's Big Announcement on Corona Vaccination; In the next couple of weeks ) 

IPL 2021: 'हा' नियम मोडल्यास कर्णधारच होणार आऊट
 
याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत पत्र लिहिले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू आले आहेत. त्या ठिकाणी  45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचे  100 टक्के लसीकरण करण्यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यात दररोज संसर्गाच्या प्रमाणात वाढ होत  आहे.  यात नव्या प्रकरणांमध्ये एकूण  78.56 टक्के इतक्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

तर दुसरीकडे नीती अयोगचे सदस्य-डॉ. व्ही. के. पौल यांनीदेखील  देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त केली आहे. परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली असून ही चिंताजनक बाब आहे. ट्रेंड दर्शवितो की व्हायरस अद्याप खूपच सक्रिय आहे. जेव्हा आपण कोरोनाला नियंत्रित केले, असे वाटते तेव्हाच हा पुनः सक्रिय होऊ लागतो. या परिस्थितीबाबत आपण सर्वानी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर देशाला गंभीर आणि अत्यंत चिंताजनक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. असा इशाराही पौल यांनी दिला आहे. 

याहून चिंताजनक बाब म्हणजे, गेल्या 24 तासात देशात 50 हजाराहूनही जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  इतकेच नव्हे तर 16 डिसेंबरनंतर पहिल्यांदाच साडेतीनशेहून अधिक संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत 53,480 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 354 लोकांचा बळी गेला आहे. तथापि, कोरोनाहूनही 41,280 लोक बरे झाले आहेत.

तर, 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण मोहिमेल सुरवात झाली आहे. त्यानंतर 30 मार्चपर्यंत देशभरात 6 कोटी 30 लाख 54 हजार 353 कोरोना डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी 30 मार्च रोजी एक दिवसांत 19 लाख 40 हजार 99 जणांचे लसीकरण करण्यात आले. तर लसीचा दुसरा डोस देण्याची मोहीम 13 फेब्रुवारीपासून सुरू झाली.  त्यानंतर आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे  लसीकरण केले जाणार आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com