केंद्र सरकारचा मोठा निर्णय: NEETPG- 2021  परीक्षा पुढे ढकलली

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 एप्रिल 2021

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे NEETPG-2021 परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. नुकतचं केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला असताना, आता NEETPG-2021 परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे NEETPG-2021 परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 18 एप्रिल रोजी होणार आहे. मेडिकल विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. असं ट्विट करुन केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितली आहे. (Central governments big decision NEETPG 2021 exam postponed)

‘मरकझ’ ला परवानगी देण्यावरुन केंद्र सरकारचा घूमजाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिक्षण मंत्री अमित ठाकरे यांनी निर्णय  घेतला आहे. 19 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या परीक्षा आता जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याची चर्चा सुरु असताना अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन 72 तासांमध्ये यासंबंधी निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली होती. आणि त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमार्फत जाहीर करण्यात येणार आहे.    

 

संबंधित बातम्या