‘’केंद्र सरकारचा गैर भाजप शासित राज्यांवर अन्याय’’; सोनिया गांधीचा हल्लाबोल

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

केंद्र सरकार गैर भाजप शासित राज्यांवर कोरोना काळात अन्याय करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

देशभरात कोरोनाचा उद्रेक मोठ्याप्रमाणात पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनामुळे देशाची स्थिती बिघडल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसनं वर्किंग कमिटीची बैठक बोलावली होती. यावेळी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. केंद्र सरकार गैर भाजप शासित राज्यांवर कोरोना काळात अन्याय करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. केंद्राकडून भाजप शासित राज्यांना सतत प्राथमिकता दिली जात असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर कोरोना संदर्भातील उपाययोजनावरही त्यांनी आपला आक्षेप नोंदवला.(Central governments injustice to nonBJP ruled states Sonia Gandhi's attack)

कॉंग्रेसशासित राज्यांना वारंवार कोरोनासंदर्भातील उपाययोजनासाठी केंद्राकडे मदत मागावी लागत आहे. कॉंग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली आहे. काही राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा आहे, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन साठा संपला आहे. या बाबी वारंवार सांगूनही भाजपशासित राज्यांना प्राधान्य दिलं जात आहे.’’ असा टीकेचा सूर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बैठकित लावला.

उध्दव ठाकरेंनी रोजचा निर्लज्ज राजकारणाचा डोस थांबवावा - पियुष गोयल

कॉग्रेसच्या बैठकित कोरोना लसींच्या निर्यातीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. दुसऱ्या देशांना मदत करण्याच्या विचारात आपल्याच देशात कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. हजारो लोक लसींच्या अभावी आपल्या जीवाला मुकत आहेत. मात्र केंद्र सरकार मूग गिळून बसल्याची टीकाही सोनिया गांधी यांनी यावेळी केली. रेमडिसिव्हीर, ऑक्सिजन यासारख्या वस्तूवर 12 टक्के जीएसटी आकारला जात आहे? त्याचबरोबर कोरोनाविरुध्द लढण्यासाठी आवश्यक वस्तू असलेल्या ऑक्सीमीटर आणि व्हेंटीलेटर यावर 20 टक्के जीएसटी का? असा प्रश्न सोनिया गांधी यांनी बैठकित   उपस्थित केला.
 

संबंधित बातम्या