सरकारी कर्मचाऱ्यांचे पालक कोरोना पॉझिटिव्ह आल्यास मिळणार 15 दिवसांची रजा

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 जून 2021

सरकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर घरामध्ये किंवा विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले असेल तर त्याला 20 दिवसांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्य़ात आले आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकादी जबाबदार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यास 15 दिवसांची रजा मिळेल. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रजेची मुदत संपल्यानंतर जर कुटुबांतील व्यक्ती रुग्णालयात असल्यास त्याला रुग्ण बरा होईपर्यंत रजेची मुदत वाढवून देण्यात येईल. कोरोना काळात उपचार घेणे, रुग्णालयामध्ये भरती किंवा विलगीकरणात ठेवणे याबाबत सरकारी नोकरदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, त्यासंबंधी मंत्रालयाने सविस्तर आदेश जाहीर केला आहे. (Centre to grant 15 days leave for government employees whose parents test positive for COVID-19)

केंद्र सरकारने दिले 74 कोटी लस खरेदी करण्याचे आदेश

आदेशात मंत्रालयाने म्हटले आहे की, जर सरकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यास 20 दिवसांची रजा मंजूर करण्यात येईल. 

दरम्यान “कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 20 दिवसांनंतर रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला रुग्णालयात केल्याच्या कागदोपत्री पुरावे दिल्यास त्याला रजा मंजूर करण्यात येईल,” असे मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे. 

मोदी सरकारने लसींच्या डोसची किंमत केली निश्चित ! खासगी रुग्णालयांसाठी 'हे...

सहकारी कुटुंबातील सदस्य किंवा पालक (अवलंबून असले किंवा नसले तरी त्याच्या सोबत राहणारे) कोविड  चाचणी पॉझिटिव्ह असल्यास सरकारी कर्मचार्‍यास  15 दिवसांची खास कॅज्युअल रजा देण्यात येईल.

मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की जर सरकारी कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तीशी थेट संपर्कात आला आणि जर घरात विलगीकरणात असेल तर “त्याला सात दिवसांच्या कालावधीत घरातून काम करण्याची मुभा देण्यात येणार आहे. 

तसेच पुढे  म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्याने विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला असेल तरिही जर तो कंटेन्टमेंट झोनमध्ये राहत असेल तर त्याला तो परिसर नॉन कंटेन्टमेंट झोन होईपर्यंत घरातून काम करण्याची मुभा असेल. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू राहतील.

संबंधित बातम्या