कर्नाटकात विधानपरिषदेत राडाप्रकरणी राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

विधानपरिषदेत मंगळवारी झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभापती के. प्रतापचंद्र शेट्टी यांनी राजीनामा देणे अनिवार्य असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बंगळूर : विधानपरिषदेत मंगळवारी झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभापती के. प्रतापचंद्र शेट्टी यांनी राजीनामा देणे अनिवार्य असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विधान परिषदेच्या मंगळवारी विशेष अधिवेशनात सभापतीपदावरून भाजप व काँग्रेस सदस्यांनी गदारोळ घातला होता. सभापती शेट्टी यांच्याविरोधात भाजपच्या अविश्वास प्रस्तावाला धजदने पाठिंबा दर्शविला असल्याने सभापतींचा राजीनामा अटळ आहे. सभापतिपदाचा राजीनामा देण्याबाबतचे इंगितही शेट्टी यांनी बोलून दाखविले आहे; पण काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी थोडी प्रतीक्षा करा, परिस्थितीचे अवलोकन करून निर्णय घेता येईल, असा सल्ला सभापतींना दिल्याचे समजते.

आणखी वाचा:

अभियांत्रिकी प्रवेशासाठी असलेल्या जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर -

संबंधित बातम्या